नखपुराण
उजव्या पायाच्या नखाचं नुकतंच देहावसन झालं…
निमित्तमात्र जखम झाली अन् आकस्मित जैविक युध्दात गनिमांपुढे नखाचा नेटाचा लढा कमी पडला.
ते बिच्चारं नख माझी साथ सोडून गेलं पण या युध्दप्रसंगी वेदना सहन करुन,शिकवून,धीर देवून गेले.
बोडकं पडलेल्या माण-खटाव मधल्या माळावानी माझा अंगठा आता बोडका पडलाय…
आजूबाजूची मरणासन्न त्वचा नाजूक वळणावरती हळूहळू साथ सोडत आहे…कोणी साथ सोडत असताना फार काळ धरुन ठेवता येत नाही…हळूवार हाताने टाटा करावा लागतो…
कालातीत नखाच्या मृत्यूनंतर नखाचा पुनर्जन्म होतो असं वैद्य म्हणतात.
या नखाचं आयुष्य बरंच होतं म्हणायचं…चांगल पालनपोषण होत होतं,परंतु नियतीपुढं आपलं काही चालत नाही,अशातच अखेर नखाने जीव सोडला…
याच नखाच्या पोटी नवीन नख जन्माला येते…त्या नवीन नखाची शांती करावी लागेल
(नखाचा ‘तेरावा’ नसतो,गोड-धोडची अपेक्षा ठेवू नये :)
नख वाढीसाठी तर्जनीने नखावर पाणी सोडावे लागेल…
(पाण्यात नख लवकर वाढते,या अर्थी..)
नखाची ‘नक्कल’ नक्की तशीच असेल की वेगळी हे येणारा काळ ठरवेल…
तुर्तास नखाची,अंगठ्याची काळजी घ्यावी लागणार हे मात्र नक्की.
दुनियेने ‘नथीचा नखरा’ ट्रेंड केलेले असले तरी पण मी मात्र ‘नखाचे नखरे’ याच स्वाभिमानी भुमिकेवर ठाम असेल.
नखस्य पुराण समर्पयामी।
जय जयतू नूतन नखम्…
नखाय नम:।।
नखम्,नूतन नखम्,संपूर्णम् नूतन नखम् आगमनस्य प्रार्थना करोमी।
(संस्कृत व्याकरणातल्या चुका काय असतील त्या शाळेतच काढून झाल्यात,इथं ज्ञान पाजळू नये,अन्यथा ‘देव’ शब्द १० वेळा लिहायला लाविन.)
नवीन नखाच्या नावानं चांगभलं।।
🤣😂🤣🤣😂
ReplyDelete😂😂
ReplyDelete🥵🥵😆🫠
ReplyDelete😀
ReplyDelete😂😎
ReplyDelete😀😀
ReplyDeleteवाढीव असतात पण नखाचे नखरे .... लै दुखलेल दिसतंय म्हणून ते साहित्यातून उतरल
ReplyDelete😄😆