विठ्ठल
विठ्ठल
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल,
जाणावा विठ्ठल मनोभावे ॥
‘विठ्ठल’ भोळ्याभाबड्या माणसांचा देव.
लहानथोरांपासून ते गरीब-श्रीमंत भेदाभेदापलीकडचा
आपलासा वाटणारा आपला देव.
तो सगुण रुपात कर कटेवर ठेवलेला सगळीकडे दिसून येतो पण निर्गुण स्वरुपात तो सर्वत्र ठाईठाई आढळतो.
तो गोरा कुंभाराच्या पायाखाली बडणाऱ्या मातीत असतो,सावता माळ्याच्या उभ्या पिकामध्ये डुलत असतो,नरहरीच्या हातोड्यात असतो,तुकोबाच्या अभंगात दंग होत असतो,ज्ञानोबाच्या विचारी बुध्दीत असतो…तो सगळीकडे असतो,पण प्रथमत: तो भाविकांच्या मनात असतो…आषाढीच्या वारकऱ्यांच्या रुपात तो मैलोनमैल चालत असतो,मृदुगं-टाळ घोषात निनादत असतो…तुळशी सारखा तो कष्टकरी भक्तांच्या/वारकऱ्यांच्या आयुष्यातला अत्यावश्यक प्राणवायू ॲाक्सिजन असतो.
वारीत तो सगळ्यांना भेटत असतो का?
कोण जाणे कदाचित वारी हेच विठोबाचं रुप असावं!
तो पोलिस म्हणून शिस्त राखत असावा वा पालखीचं सारथ्य तोच करत असावा…
कपाळी बुक्का तोच लावत असावा वा रिंगणात अश्व म्हणून तोच धावत असावा…
तो कसा असावा हे वारीतला वारकरी वेगवेगळ्या रुपात शोधत असतो…
तो असतो अनंत चैतन्याचा भंडारा,
तो असतो पिकं पिकवणारा पावसाच्या धारा,
तो असतो संसर्गजन्य उत्साहाचा झरा,
तोच वाहतो होवून मंगलमय वारा…
तो वाहतो बनून जीवनदायी नदी,
कधी भीमा कधी चंद्रभागा…
तो असतो जना-जनाला,समाजाला जोडणारा,
एका भागवत पताक्याचा धागा..!
तो असतो काळा पाषाणी दगड,
ना गोरागोमटा संगमरवर,
तरी त्याचा लळा लागतो जीवास असा,
जसा प्रेमळ,हट्टी असा बाळ कडेवर.
तो माऊलीच्या पावलांत असतो,
झाडाच्या सावलीत असतो..
तुकोबाच्या अवलीत असतो,
धनधान्याच्या पायलीतही तोच असतो..
तो बाप असतो पण तरीही तो आईच जास्त असतो,
विटेवर उभा राहून तो सहिष्णू कणखर दर्शन देत असतो.
सुंदर ते ध्यान घेवूनी,
कर कटेवर घेवूनिया,
विटेवर उभा युगानयुगे,
जो ठाई अट्टल,
तो असतो विठ्ठल,
तो असतो विठ्ठल!
©सुजित
देवशयनी आषाढी एकादशी
२९ जून २०२३
तो असतो आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात.... #बा विठ्ठल..
ReplyDeleteअप्रतिम दादा❣️
धन्यवाद स्वप्निल🙏🏼❤️
Deleteसुंदर...👌👌
ReplyDeleteविठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..🙏🙏
धन्यवाद माऊली❤️
DeleteJay hari विठ्ठल
ReplyDeleteरामकृष्ण हरी॥❤️
Delete👏👌
ReplyDeleteधन्यवाद❤️
Delete🙏🏻🕉️👌😇
ReplyDeleteधन्यवाद❤️
Deleteठायी ठायी विठ्ठल...अप्रतिम वर्णन....अन तोच विठ्ठल या लेखणीत पण असतो ...रामकृष्ण हरी माऊली
ReplyDeleteधन्यवाद गुरु🙏🏼❤️तो असतो शिक्षक अन् तोच असतो रक्षक🥰
DeleteVery nice sujit !
ReplyDeleteThank you Anonymous 🙏🏼😂
DeleteEk number
ReplyDeleteThank You Anonymous 🙏🏼🤣
DeleteKhup Chan 👌
ReplyDeleteThank You Anonymous 🙏🏼😁
Delete