Posts

Showing posts from June, 2026

बाप

Image
काहीतरी   असतंच   बापाबददल, बोलायचं   राहून   गेलेलं ... आयुष्याच्या   किनाऱ्यावर , आठवण   म्हणून   वाहून   आलेलं ... बोटाला   धरुन   चालायला   शिकवणारा .. चुकल्यावर   गालावर   बोटं   उमटवणारा ... खांद्यावर   हात  टाकून  जत्रा   फिरवणारा , अन्   रेवड्यांसोबत   गोड   गारेगार   घेणारा ... समुद्रातल्या   लाटेत   नावा   वर   खाली   होताना , मनात   भीतीची   चलबिचल   चालू   असते ... तेव्हा   बकोटीला   धरुन   शांत   करणारा ... आयुष्यात   नेहमी   धीरोदात्त   असणारा ... हेंदकळणाऱ्या   जीवाला   घट्ट   उभं   करणारा ... बापच्   असतो   तो ...! पडत्या   पावसात   चालणारा ... स्वत :  भिजून   मुलांवर   छत्री   धरणारा , ‘ काही   नाही   झालं ’  असं   स्वत :  आजारी   असल्यावर   म्हणणारा , मुलं   आजारी   झाल्यावर ...