प्रेम म्हणजे प्रेम असतं...
जिप्सी,तुम्ही म्हणायचात, “प्रेम म्हणजे,
प्रेम म्हणजे,प्रेम असतं..”
खरंच का हो जिप्सी,तुमचं-आमचं सेम असतं??
नसेल हो तसं ‘सेम टु सेम’
होतो कधी कधी,मध्येच कुठेतरी गेम.
कुणाचं प्रेम असतं,खोल मूळात रुजलेलं...
कुणाचं वादळ-वाऱ्यात मोडून पडलेलं...
मग कसं असतं प्रेम ‘सेम टु सेम?’
असतो का त्याचा,बदामात खोचलेल्या बाणाचा नेम?
कुणाचं प्रेम असतं वाऱ्यावर झुलणारं..
कुणाचं वाऱ्यासंग उडून भूर जाणारं...
दिसत नसताना कसं त्याला धरुन रहावं?
स्पर्शून जाणाऱ्या झोताला कसं ‘नाही म्हणावं?’
खरंच का हो असतं प्रेम ‘सेम टु सेम?’
नकळत उमलत जाते अल्लड गुलाबाची कळी...
बेधूंद होऊन हरवत जातो वेळी-अवेळी.
घेते फुलाचं रुप कोणा एकाची कळी,
दिला जातो कुणा एका कळीचा मध्येच बळी!
खरंच का हो असतं प्रेम ‘सेम टु सेम?’
जिप्सी,कुणाचा प्रवास होतो दिगंताचा...
रुतते कुणाची गाडी,तळ-गाळ-चिखलात.
चिखलात रुतुन का कुणाचं बनतं,‘रम्य शिल्प?’
कुणाचं प्रेम असतं दीर्घ,कुणाचं अगदीच अल्प.
खरंच का हो असतं प्रेम ‘सेम टु सेम?’
प्रेमात काहींच्या असेल चाॅकलेटची गोडी,
असेल कोणाच्या आघाडीतच् बिघाडी,
खरंच सगळी स्टोरी घडते का खरी?
स्वीटहार्ट बिस्किटसुध्दा असते थोडेसे खारी!
खरंच का हो असतं प्रेम ‘सेम टु सेम?’
जिप्सी,असतो रस्ता महाकाय द्रुतगती,
वेग सुसाट अन स्टीयरींगवर प्रीती,
पोहोचतात का सगळ्या गाड्या इप्सितस्थळी?
जेव्हा मनात धडधडते अपघाताची भीती?
जिप्सी,....होतो ना इथे सगळाच गेम?
असो...असती-वसतीचं ते एक काव्य,
ऐकावं कुणी एक,ते मधूर श्राव्य,
प्यावे कोणी चातकाने,एक प्याला द्रव्य,
इश्श-इश्कवाली स्टोरी ती भव्य!
असेलही जिप्सी,थोडंफार सेम...
प्रेमच् हो ते ‘प्रेमम-प्रेमम’ जेम!
जिप्सी,असेल वा नसेल,
सेम टु सेम-प्रेम...
तरी भावना सु:खद,
त्याचं काहीही असो Name!
बाकी,गणित का असे ते सोडवायला?
समजून x काहीतरी,आणि y ला मनवायला?
चित्रकलाच व्हावी ती सौम्यरेषांची...
शुभ्र आयुष्यावर उत्कटता ती रंगाची...
प्रेम असेल कधी विषम-कधी सम.
कशाला हवंय ते सेम टु सेम?
©सुजित
अनुभवाचे बोल..😂😂
ReplyDeleteअति सुंदर कविता👌👌👌👌
😂😂😂
Deleteकसला आलाय अनुभव अन कसलं काय😂😂
वाहह.. खूपच छान...👏👏
ReplyDeleteधन्यवाद डाॅक्टर🙏🏼😁
DeleteBaappp lihilay .....nastach prem kunacha same to same
ReplyDelete