श्रावणसरी

मैथिलीने घड्याळात पाहिले... वाजत आले होते..सूर्यास्त दिसण्याची शक्यता नव्हतीच..ढग दाटून आले होते...पण तरी मैथिलीला घाटावरच्या कड्यावर जायची तीव्र इच्छा होतीच...तिने पार्किंगमधून आपली स्विफ्ट बाहेर काढली...आणि रेडिओ सिटी नाईन्टीफाईव्ह पाॅंईंट फाईव्ह एफ एम वर आरजे संयमीचा मधूर आवाज ऐकू लागली...


मैथिली..प्रचंड बुध्दिमत्तेची चुणचुणित मुलगी...गावात राहून गणितात मास्टर्स केलेली आणि आता एका मोठ्या बिझनेस कंपनीमध्ये डेटा ॲनेलिसिस्ट असणारी...सगळं काही तल्लख बुध्दीने करणारी आणि कुटुंबीय आयुष्यात सर्वांना सामावून घेणारी...

सकाळी दूध द्यायला येणारा राजूदादा असो की किराणा डिलीव्हरी करणारे मोरेकाका असो...सगळ्यांना मैथिली वर्षातून किमान - वेळा तरी नक्कीच घरी चहापानाला,दिवाळीला बोलवत असे...नव्या शहरात राहत असताना तिने गावाकडची एकत्रित कुटुंब पध्दतीतली बांधणी चांगलीच आत्मसात केलीहोती त्यामुळे शहरात तिचे हक्काचे नातलग असे वडाच्या पारंब्याप्रमाणे विस्तारले होते...


स्विफ्टची काच पूर्ण वर घेवून एसी लावला तरी मैथिलीला घाम फुटला होता...केसांची बट पुन्हा मागे सारुन तिने पुन्हा एसी वाढवला आणि तेवढ्यात रेडिओवर ‘माझं घर माझा संसार’ मधलं 

दृष्ट लागण्याजोगे सारेगालबोटही कुठे नसे 

जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे!

हे गाणं कानी पडायला लागलं...तसं तर हे गाणं मैथिलीला लहानपणापासूनच प्रचंड आवडायचं...रेल्वेमध्ये फुलणारं-झुलणारं मुग्धा चिटणीस-अजिंक्यदेवचं प्रेम अन् रेल्वेसोबत आपल्यालाही पुढं घेवून जाणारा अनुराधा पौडवाल-सुरेश वाडकरांचा आवाज...मैथिली गाण्यात बुडून गेली असली तरी तिच्या मनात वेगळंच चित्र उभं राहिले होते...तिने दोन्ही काचा खाली ओढल्या आणि मोकळी हवा आत येवू दिली...


तीन महिन्यापूर्वीची दुपार...खास रविवार म्हणून मैथिलीने तिच्या जवळच्या खास मित्राला तेजसला उर्फ तेज्याला जेवायला घरी बोलवले होते...तेज्या हरहुन्नरी पोरगा...वाचायला बसला तर दिवस दिवस कादंबरीत बुडालेला नाहीतर मग स्कुटीवर रस्त्यावरची ‘हिरवळ’ पाहण्यात - तास घालवणारा...बिनधास्त राहताना बाॅसच्या आरेला कारे करताना “चाललो मी बॅग भरुन वावरात कामाला” म्हणणारा...तेज्याच्या या स्वभावावरुन त्याला तेज्या ऐवजी ‘तेज्या आयला’ याच नावाने जवळचे मित्र हाक मारायचे...


रविवारी दुपारी तेजाभाई स्कुटी घेवून मैथिलीच्या सोसायटीमध्ये प्रकट झाले...येताना मैथिलीच्या आवडीचा बोरकुट आणि बाॅबीचा पुडा हातात नाचवत आले...मैथिलीने हातातून ओढून दोन्हा पुडे घेतले आणि वाॅश बेसिनकडे जाण्याची डोळ्यानी सूचना केली...


 मैथिली...काय भारी सेंट मारलायस गं तू घरात...अगदी इथंच बसू वाटतंय....एवढा भारी सेंट तर मी अंगावर पण कधी मारत नाही


हात धुवून झाला असेल तर ये इकडे,तुझ्या अंगावर पण रुम फ्रेशनर मारते” 


तेज्याने जाता जाता कपाटातली नवी कोरी कादंबरी पाहिली...फक्त ती उघडून त्यातल्या पानांचा वास घेवून त्याने श्वास धरुन ठेवला...


मैथिलीने मस्त जेवन बनवलेलं...तेज्याला तिच्या हातचं जेवन प्रचंड आवडायचं...आळूवडी पाहून त्यांनं तिला नमस्कार केला...ती हसली..तिच्या आज्जीने दिलेली लोणच्याची एक बरणी तर तेज्यानेच लंपास केली होती...मस्त आडवा हात मारुन झाल्यावर तेज्याने तिला “व्वा...सुख!” म्हटलं..तिने पापण्यांनीच त्याला साद दिली...


जेवून झाल्यावर मैथिलीने तेज्याला बडिशेप दिली आणि दोघे गॅलरीतून लांबवरचा डोंगर बघू लागले...उन्हाळ्यात पिवळे पडलेले गवत अन् भकास वाटणाऱ्या गोष्टी बघून दोघे गप्पा मारत होते...मैथिलीने “तेज्या,काय मग कधी करतोयस लग्न?”

करायचं ...पण तुझ्यासारखी पोरगी थोडीच मला होकार देणार आहे?” तेज्या हसायला लागला...

अन् मैथिलीने “का नाही होकार देणार?” अशी थेट गुगलीच टाकली...

तेजाची भंबेरीच उडाली हे ऐकून ! 

पण मैथिलीनेच पुन्हा “मी काय अजून  वर्ष तरी लग्न करत नसते तेज्या” असं सांगताच तेज्याचा चेहरा पडला...

तेज्या तिच्याच वयाचा; पण घरच्यांनी  वर्षापासून लग्नावरुन त्याचा किस पाडला होता...आबांच्या खालावलेल्या तब्येतीमुळे तेज्याची विकेट पुढच्या वर्षीपर्यंत हमखास पडणार होती...त्यात मैथिलीचं  वर्षाचं लोटणं तो कसं बाजूला सारणार याचीच त्याला आता धग लागली होती...


मैथिली,तुला मी चांगला वाटत असेल तर पुढच्या वर्षी तू माझ्यासोबत लग्न करशील का?”

तेज्याचं एवढं शुध्द वाक्य ऐकून मैथिली हसू लागली पण ती अजून  वर्ष तरी लग्न करणारच नव्हती...


नाही रे तेज्या... वर्ष मी लग्न नाही करणार...म्हणजे  नाहीच नाही!”

बघ की राव काहीतरी विचार कर.”

नाही रे तेज्या...जमणार नाही.तुला घाई असेल तर घे तुझं तू उरकून.”

मैथिली,तू सोबत असतीस तर मस्त वाटलं असतं आयुष्यभर...”

जाऊदेत तेज्या...तुझं तू करुन घे...मी करेन  वर्षानी मिळेल त्याच्यासोबत...आत्ता मला फक्त करीयरवर लक्ष द्यायचंय...लग्न काय ‘हा किंवा तो’...काय फरक पडतो?”

तेज्याचा चेहरा पडला..


तेज्या हळूच ‘ओके’ म्हणाला...

मैथिली,मी निघतो

तेज्याने,टिव्हीसमोरची स्कुटीची चावी उचलली आणि खाली उतरुन निघून गेला....


मैथिलीला तेज्याचा डॅंशिंगपणा माहितच होता...पण तेज्याचं तिच्यात अडकलेल मन जास्त माहित नव्हतं...त्याची इमोशनल ॲटॅचमेंट ती तितकीशी जाणून नव्हती...


नंतरच्या दिवशी तेज्यानं तिला बघून “गुड माॅर्निॅग” म्हटलं पण तिनं वर मान काढून लुक सुध्दा दिला नाही...तेज्या सगळ्यांना जी एम जी एम करत त्याच्या केबिनमध्ये शिरला आणि कामात बुडाला...

दुपारी सगळे मित्र डायनिंग टेबलवर बोलले मात्र मैथिलीने तेज्याला काहीच रिप्लाय नाही दिला...तेज्याला क्लिक झालं आणि जाताना तो तिला साॅरी म्हणून निघून गेला...


मैथिलीने तेज्याला जवळपास इग्नोर करणं सुरु केलं...तेज्या सुध्दा तिच्या टेबलपर्यंत जावून  बोलताच माघारी येवू लागला...खूप जवळचे दोन मित्र-मैत्रिण खूप दूर झाले...नंतर तेज्या सर्वांसोबत जेवन करणं सुध्दा टाळायला लागला आणि एकटाच खूप उशीरा जेवायला जाऊ लागला...आधीच घरच्यांचं दडपण आणि आता मैथिलीपासूनचं दूर जाणं यामुळे तेज्या खूप शांत शांत झाला... दोन महिन्यानंतर तेज्या तडकाफडकी  आठवड्याची रजा टाकून घरीगेला...


आबा,वाड्यात लाडू कधी?”म्हणत तात्या वाड्यात आले...

हे बगा,तेज्या आलाय कालच!आता टाकू बघून याच आठवड्यात” म्हणून आबांनी तेज्यावर बाॅंब टाकला....


खरंतर सगळ्या दबावापासून निवांत राहायला घरी आलेला तेज्या आता आणखीच बिथरला...


संध्याकाळी,स्प्लेंडर काढून तेज्या बाहेर पडला...रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती पण तेज्याच्या डोक्यात मात्र विचारांचीच गर्दी झाली होती...लक्ष गाडीवर,रस्त्यावर नव्हतेच त्याचं...


खड्डाक...थड्ड...!’ गाडी रस्त्याकडे उभ्या थांबलेल्या गाडीला धडकली...

तेज्याच्या गाडीचा स्पीड खूप होता..तेज्या उडून दुसरीकडे पडला...नंतर पुढचं त्याला काहीच समजलं नाही...


अपघातात गंभीर जखमी तेज्याला लगेच ॲडमिट केलं..रक्त खूप गेलं होतं पण लोकांनी पटापट रक्तदान केलं...- दिवस तेज्या बेशुध्दच होता..नंतर शुध्दीवर आला तसा त्याला आई दिसली...अन् तेज्याच्या डोळ्यातून पाणी ओघळले...


 आठवड्यानंतर पण तेज्या काही कंपनीतल्या मित्रांना दिसला नाही...काहींनी फोन ट्राय केले पण “ या नंबरची सेवा बंद आहे” हेच कानी पडत राहिले...

मैथिलीला सुध्दा तेज्या दिसला नाही,पण तिने कोणाला काही विचारले नाही वा त्याला फोन ट्राय केला नाही..


तेज्याचा मोबाईल कधीच फुटून पडला होता...कोणीतरी पिशवीत मोबाईल भरुन टाकला होता...


पुढच्या आठवड्यात तेज्याच्या घरी कंपनीचं लेटर आलं...आबांनी ते तेज्याला दिलं...मग तेज्यानं आबांच्या मोबाईलवरुन एच आरला आणि त्याच्या बाॅसला मेल करुन अजून एक महिन्याची बेडरेस्ट हवी अशी विनंती हाॅस्पिटल सर्टिफिकेट सोबत जोडून मागितली...


इकडे ॲाफिसात तेज्याच्या एका मित्राने पुढच्या आठवड्यात दुपारी तेज्याचा विषय निघतात “तेज्याचा जोराचा ॲक्सिडेंट झालाय...अजून महिना दिडमहिना तो बेडवरुन उठणार नाही असं सांगताच सगळ्यांनाच मोठा शाॅक बसला!


मैथिली,पाणी पी,वर बघ..वाटतंय का आता ठिक?” असं स्वराने तिला विचारले...सगळ्यांनी जेवनं उरकतं घेतलं आणि आपापल्या जागेवर गेले...


समोरचं वातावरण भारावून टाकणारा तेज्या...हसवणारा तेज्या...पुस्तकांच्या पानात हरवलेला तेज्या...सगळ्यांना मदतीसाठी नेहमीच पुढं असणारा तेज्या...चहासाठी २० किलोमीटरचा तह करणारा तेज्या...नुसत्या एक  एक आठवणींचा बोलपट तिच्या नजरेसमोर पळत राहिला...पण आता फक्तच चित्र दिसत होते...त्याचे शब्द मुकेच होते...


आज रविवार...तीन महिन्यापूर्वीचा ‘तो’ रविवार..आणि तेव्हापासूनचा तिचा रुसवा आज अगदी गळून पडला होता..तेज्याचा नंबर तिने डायल केला पण मोडून पडलेला त्याचा फोन काही लागलाच नाही...


हेलो,मी तुमची लाडकी संयमीऽऽऽऽ आणि तुम्ही ऐकत आहात तुमचा आवडीचा रेडिओ सिटी नाईन्टीफाईव्ह पाॅंईंट फाईव्ह एफ एम...”

मध्येच रेडिओचा आवाज खरखरायला लागला...तिने काचा पुन्हा वर घेतल्या..

बघितलेत मित्रांनो...जर रेडिओची आणि सॅटेलाईटची फ्रिक्वेंसी मॅच झाली नाही तर कसा खरखर आवाज येतो ते...!अगदी आपल्या आयुष्यात देखीलआपल्या जवळच्या व्यक्तींसोबत आपली फ्रिक्वेंसी मॅच झाली नाही तरी अशीच खरखर होते अन मग आपल्याला सुंदर मैफिलीचा आस्वाद घेता येत नाही..”


संयमीच्या त्या एका वाक्याने मैथिलीला वेगळ्याच उंचीवर नेले होते...कड्यावरच्या सनसेट पाॅंईटला ती पोहोचली अन् गाडीतून उतरली...आणि हवेच्या झोतासोबत तिने तेज्याला शिव्या घालून रडायला लागली...

हळूहळू अंगावर पडणारा पाऊस आणि तेज्याच्या आठवणींत भिजलेली ‘ती’ यावेळी वेगळ्या प्रकारचं भिजणं अनुभवत होती...तीन महिन्यापासूनचं मळभ तिच्या मनातून दूर होत होते...ती समोर दिसणारी हिरवीगार दरी...छोटे छोटे धबधबे सगळं बघत होती...डोळ्यांत क्लिक करत होती...


तिच्या आयफोनवर रिंग वाजू लागली...अननोन नंबर होता...तिने कट केला...पुन्हा रिंग वाजू लागली...तेज्या असेल म्हणून तिने रिसिव केला...अन् तिकडूनहेलो मैथिली,तेज्या बोलतोय” कानावर पडलं....

तेज्याऽऽऽऽ हरामी...,....,...” जेवढ्या येतील तेवढ्या शिव्यांचा दांडपट्टा तिने चालवला...

तेज्या फक्त हसत होता....अनट्युन झालेले दोन खास,जिगरी मित्र-मैत्रिणीचे नाते पुन्हा ट्युन होत होते...त्यांच्यासाठी ते दोघे ‘रिचेबल’ झाले होते...त्यांचाटाॅकटाईम’ सुरु झाला होता...

आत्ता कुठे त्यांच्या रिलेशनचा ‘श्रावणमास’ सुरु होत होता...आत्ताशा कुठे त्या ‘चिंब भिजण्यात’ चिंब भिजण्यातला आनंद ती घेत होती...सलाईनचा  एक एक थेंब तेज्याला टाॅनिक वाटत होता...अंगावरची मरगळ झटकून डाॅल्बी लावून गणपती डान्स करावासा वाटत होता...

अन पुन्हा एकदा...पुन्हा एकदा एखाद्या निवांत रविवारी,मस्त तिच्या हातचं जेवन खावू वाटत होतं अन नंतर तिच्या हातचा चहा पिऊ वाटत होता....एकदम कडकऽऽऽ!


©सुजित

Comments

  1. व्वा.....सुख👌👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. थॅंक यु अनघा..🙏🏼☺️

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल