एक पाऊल
त्यांच्यासाठी एक पाऊल धावशील का?
भूकेल्या जीवांना चार घास देशील का?
नको त्यांना तूप रोटी किंवा श्रीखंडाची वाटी,
पण शांत झोपेसाठी चार घास दररोज देशील का?
रुपयाच्या चिल्लर वर नाहित सुटत प्रश्न!
जगणं अशक्य त्यांचं,पण नजरेत असतीलच कि स्वप्न!
उद्यातरी त्यांना प्रेमाने तू गोंजारशील का?
डोळ्यातलं पाणी त्यांच्या पुसशील का?
दाहीदिशा दिवे जळतात तुझ्या गाभाऱ्यात,
मार्गात त्यांच्या ‘उजेड’ पाडशील का?
काळोखात भटकणाऱ्या तुझ्या लेकरांसाठी,
कर्तृत्वशाली ‘मशाली’ तू पेटवशील का?
त्यांच्यासाठी एक पाऊल धावशील का?
तूच कर्ता आणि करविता असं आम्ही मानतो,
अन् नकळत हातामध्ये ‘भविष्य’ शोधत फिरतो.
रस्त्यांवर हात पसरणाऱ्या बाहूंमध्ये ‘उज्ज्वल’ भविष्य उमटवशील का?
सांग आणि सांगच्
त्यांच्यासाठी एक पाऊल धावशील का?
©सुजित
सप्टेंबर २०१४

Comments
Post a Comment