Posts

Showing posts from 2017

तेजोमय

Image
लोपले दिन अस्तित्त्व, पहुडे दाहीदिशा तिमिर, तेजस्वी ज्वालांचे तख्त प्रकटे भेदण्या वाट सुकर. अस्तास जाई भास्कर, क्षितिजास पार ओलांडून. तद्दन कवडसे किरणांचे सोडून एकाकी ब्रह्मांड. नाही अजून अंत, केवळ प्रस्थान निशागमन. अवघाची प्रवास बाकी पूर्णत्वास अखंड परिवलन. ©सुजित ३१/१२/२०१७

वृक्षवल्ली

Image
चालता चालता माझं शीर एका झाडाला धडकलं, लावता हात डोक्याला बंध वहाणेचं निसटलं.. क्षणात पडणार तेवढ्यात एका फांदीनं पकडलं, चार टकोरी टोळक्यात इज्जतीत  मात्र वाचवलं ! क्षणभराच्या ओळखीत मनामनांच हितगूज जुळलं, थोडं बोलावं म्हणून माझं मन तिथंच घुटमळलं.. आता झाडयाशी का कोण बोलतं ? असं खुद्द झाडालाच वाटलं.. बोलघेवड्या पोरट्याला त्यानं इशाऱ्यातच ईचारलं. होतंच मूळी ते वटवृक्ष डेरेदार आणि बहरलेलं, माझ्या दिलखुलास गप्पांनी ते 'देखणं' नकळत शहारलं.. बस कर लाजू नकोस असं बोलणार तरी कसं..? माजलेल्या मानवी पाश्यामुळे ते बिचारं एका फांदीसह कोसळलं . "किती ओरबडतो तुला आम्ही,दुखत नाही का कुठं ?" "दुखलेलं मन ऐकून घ्यायला ,तुम्ही लोक कधी येता का इथं..?" "कधी फळं, कधी फुलं तर कधी चंदनाचं खोड," "गरजेनुसार सगळेच करतात आमची तोडातोड ." "खूप शिकवतात शाळेत तुम्हाला झाडं जगवायला," "पण शिकलेलीच लोकं मात्र पुढे असतात मुळासकट उखडायला !" "अशिक्षित तुम्ही कि जंगलाचे वनवासी..?" "कृतज्ञता व्यक्त करतात 'चिपकून...

कबड्डी...कबड्डी...कबड्डी...

Image
       सूर्याची किरणं क्षितिजाला समांतर झाली ...दिवस अस्ताला जायच्या लगबघित होता...सकाळी गावाबाहेर पडलेली जनावरं धन्यासोबत गावात परतत होती...दिवसभर शांत असलेलं गाव पुन्हा एकदा गावगर्दीने न्हावून निघत होतं... कोणी आडावर पाण्यासाठी कावडी घेऊन जात होतं तर कोणी अंगणात पाण्याचा सडा मारून मातीचा धुराळा शांत करत होतं...एक सुहासिक मृदगंध आसमंतात दरवळत होता...मनाला उल्लासित करत होता..       चहाचा घोट पिऊन झाल्यावर तोंडात चिरमुऱ्याचा भुकना भरून "आई,मी देवळासमोर खेळायला जातो" म्हणून गज्याने देवळाकडे फटफटीच्या आवाजात धूम ठोकली...तोवर बाकीच्या पट्टयानी हातात काठी घेऊन मैदानाची सीमा आखली होती...२ कर्णधारांनी आपापल्या खस्कीतले आपले मित्र ताडून संघात घेतले...चड्डीतले १२ वर्षाचे कबड्डीपटू भुईचा भंडारा लल्लाटी लावून खेळायला सज्ज झाले...       विक्याने ओपनिंग केली...कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी ...बड्डी ..बड्डी ..कब्बडी...बडी.. बडी... गर्जना करून वातावरणात जान आणली...विक्या इरेला पेटून खेळायला लागला...समोरच्या संघात विक्याला घेरायची रणनिती शिजत होती...ते...

पाऊस

Image
कधी अवतरतो घेऊनि इंद्रधनुचे रंग.. कधी दरवळतो हलकासा मृदगंध.. ओल्या तुझ्या मिठीत अंग.. बरसतो तू कधी बेधुंद..कधी चिंब चिंब.. ओढ तुझी लहान थोरास, पशू असो वा मानवास, कधी भेगाळलेल्या भूईस.. वा चातकाच्या घशास. कोसळतो तू कधी मोतेरी हिरा, कधी गारठलेल्या अल्लड गारा.. सह्यपासून हिमाद्रीपर्यंत.. तू  असतोस जिने इक सहारा. तू आढळतो वेधशाळेच्या गणितात, किंवा शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या हिशेबात.. शेतकऱ्यांच्या पेरणीच्या स्वप्नात, अन कधी अविश्वासी दुष्काळात. तू दौडतो कालिदासाच्या महाकाव्यात, वा ग्रेसांच्या शुभ्र निखळ झऱ्यात... चंचल तू,अभेद्य तू,अविरत धावतोस तू, अन लुप्त होतो अथांग खारट सागरात पाऊस तू..वर्षाव तू.. वरुण तू..वसुंधरेचा प्रियकर तू.. मनात तू...रानात तू.. भेटीस ये- लवकर तू...मखमली वनात तू... © सुजित पंडित

The Light

Image
Day or nights, You twinkle in my sights, It makes us bright You are the Light! No matter how far you are, No matter how long it takes, I'm assured of your presence, For this,i can put forth all of my stakes ! You are warm, The pretty chinook charm, Who welcomes the needy souls By stretching your arm! You are the shiny, The sweetest honey, Your just presence Energizes every tiny! You are The Light, Who fights for the right, Inspires the ground To take a flight!