कबड्डी...कबड्डी...कबड्डी...
सूर्याची किरणं क्षितिजाला समांतर झाली ...दिवस अस्ताला जायच्या लगबघित होता...सकाळी गावाबाहेर पडलेली जनावरं धन्यासोबत गावात परतत होती...दिवसभर शांत असलेलं गाव पुन्हा एकदा गावगर्दीने न्हावून निघत होतं... कोणी आडावर पाण्यासाठी कावडी घेऊन जात होतं तर कोणी अंगणात पाण्याचा सडा मारून मातीचा धुराळा शांत करत होतं...एक सुहासिक मृदगंध आसमंतात दरवळत होता...मनाला उल्लासित करत होता..
चहाचा घोट पिऊन झाल्यावर तोंडात चिरमुऱ्याचा भुकना भरून "आई,मी देवळासमोर खेळायला जातो" म्हणून गज्याने देवळाकडे फटफटीच्या आवाजात धूम ठोकली...तोवर बाकीच्या पट्टयानी हातात काठी घेऊन मैदानाची सीमा आखली होती...२ कर्णधारांनी आपापल्या खस्कीतले आपले मित्र ताडून संघात घेतले...चड्डीतले १२ वर्षाचे कबड्डीपटू भुईचा भंडारा लल्लाटी लावून खेळायला सज्ज झाले...
विक्याने ओपनिंग केली...कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी ...बड्डी ..बड्डी ..कब्बडी...बडी.. बडी... गर्जना करून वातावरणात जान आणली...विक्या इरेला पेटून खेळायला लागला...समोरच्या संघात विक्याला घेरायची रणनिती शिजत होती...तेवढ्यात रंज्याच्या हाताला विक्याचा पाय लागला अन खसकन पकडून विक्याला जमिनीवर लोळवलं गेलं...झालं...कॅप्टन आऊट झाला...मग समोरच्या संघातून एक कार्यकर्ता चाल करून गेला...झटक्यात १ सावज टिपून तो माघारी वळला..पुन्हा विक्याचा प्लेयर निदान रेषेला वंदन करून चड्डी सावरत बड्डी बड्डी करत शत्रूच्या छावणीत घुसला....क्षणात झालेल्या हालचालीत त्याने 3 जणांना पाय मारला....पण मधेच माशी शिंकली अन माघारी वळताना त्याचा पाय घसरला...पापणी लवेपर्यंत रंज्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला....आज रंज्याने बहुतेक मारुतीच्या देवळातला प्रसाद खाल्याने फॉर्मात येऊन २ बळी टिपले होते...मग काय त्याच 'कॉन्फीडोंस' मधेच त्याने शत्रुसंघावर चाल केली...समोर अवघे ४ खेळाडू शिल्लक होते...त्यातला एक तर काडी पैलवानच होता,तो नेहमी सगळ्यात मागं फक्त उडया मारायचा...रंज्यानं पुन्हा हिंगा दाखवत एकाला कात्रजचा घाट दाखवला...
आता विक्याचा संघ हरणार हे तर नक्की होतं... रथी महारथी बाहेर बसून नखं कुरतडत होते...३ तिघाड संघाचा पराभव साफ समोर दिसत होता....नावाला बाप्या समोरच्या क्षेत्रात गेला खरा...पण बड्डी बड्डी करण्याच्या पलीकडे काही न करता घाबरून मागं फिरला....पुन्हा आक्रमण झालं...आता कमी संख्या असल्यानं शत्रुसंघाला विजय आवाक्यात होता...त्यातच प्रतिस्पर्ध्यांनं एकाला त्यानं ताडलं अन आल्यापावली तो कार्यकर्ता माघारी वळला...आता चित्र स्पष्ट दिसत होतं.. २ विरुद्ध ७ !
टॉम्याने शत्रूंवर चाल केली....अगदी गुगली टाकत त्याने दोघांना पाय मारला....गानिमांनी डाव रचला..समोरच्या साखळीत तो पुरता अडकला.....समोरून थोपवण्याचे जबरी प्रयत्न झाले...बड्डी बड्डी...क....ब...डडी... ब..डडी... ब..डी..... उसास टाकत टॉम्या सुटकेचा प्रयत्न करू लागला....जमिनीवर लोळल्यानंतर त्याने मधल्या रेषेवर हात मारला...पण त्याला इंचभर मागं खेचलं गेलं...ब...डी... बड्डी...कबड्डी...कबड्डी...कबड्डी....करत टॉम्या पुरता पेटला....अंगात वीज चमकल्यासारखा सर्वांगाला झटका देत त्यानं पुन्हा मधल्या रेषेवर हात मारला...पण केवळ टीचभर अंतर कमी होतं... इकडं त्याचे पाय ओढले जात होते...आणि टॉम्या...श्वासाला आवर घालत रेषेकडे सरकत होता....अंगात होतं नव्हतं त्राण आणून त्यानं शेवटचा घाव घातला... अन रेषेवरचा धुराळा त्याच्या तोंडात उडाला....एका टोम्यानं समोरच्या टीमला पाणी पाजलं होतं.... सगळे गनीम माना खाली घालून अंगावरचा फुफाटा झटकत होते...आणि इकडं विजयाचं जल्लोषी सेलेब्रेशन चालू होतं....
झालं...अंधारून आल्यानं डाव संपला...डावाच्या सुरवातीचा नूर एका क्षणात पलटला... एका योग्य संधीने अनपेक्षितपणे यशाचं कोंदण मुठीत आलं...कोणी जिंकलं...तर कोणी कमी पडलं...पण निश्चितपणे कोणीच हरलं नाही....सतत पराभवाच्या छायेत असलेला टॉम्या मातीत पडला...जिंकण्याची नशा श्वासातून अंगात शिरली..धापा टाकत अंग मारत राहिला...तीन वेळा हात मारून सामना जिंकला....अन डावाचा बाजीगर ठरला....असंच असतंय....आपण जेव्हा किती कमी पडतोय त्याचा नीट विचार करून डाव लढवला तर अवघड डाव सुद्धा केवळ एका इंचाच्या अंतरावर आपल्या यशासाठी उभा असतोय...आपल्याला केवळ न थकता,न हरता डाव मारता यायला पाहिजे...जिंकलो तरी आंनद आणि पडलो तरी लढल्याचा गर्व!

Comments
Post a Comment