तेजोमय

लोपले दिन अस्तित्त्व,
पहुडे दाहीदिशा तिमिर,
तेजस्वी ज्वालांचे तख्त
प्रकटे भेदण्या वाट सुकर.

अस्तास जाई भास्कर,
क्षितिजास पार ओलांडून.
तद्दन कवडसे किरणांचे
सोडून एकाकी ब्रह्मांड.

नाही अजून अंत,
केवळ प्रस्थान निशागमन.
अवघाची प्रवास बाकी
पूर्णत्वास अखंड परिवलन.

©सुजित ३१/१२/२०१७

Comments

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल