२ वर्षांच्या सांध्यावरती...
गावाकडच्या,शहरांतल्या जून्या घरांत साल सरलं की खुंटीवर जून्या दिनदर्शिकेपुढे नविन दिनदर्शिका टांगली जायची. अगदी पूर्ण खुंटी भरेपर्यंत.
पुढं माणसं जरा कलंदर झाली,घरातल्या खुंट्या जावून हॅंगर आले तशी दिनदर्शिकेची जागा कॅलेंडरने घेतली.
हॅंगरवर अपुरी जागा असल्याने जुनी दिनदर्शिका काढून तिथं नविन कॅलेंडर लागायला लागलं.
२० व्या ते २१ व्या शतकात असं लघू संक्रमण व्हायचंच होतं. ते होत गेलं. छोट्या पिनच्या चार्जरपासून ते इलेक्ट्रिक गाड्यांपर्यंत.
असो…
वर्ष संपलं! खूप काही देवून-घेवूनच संपलं.
कभी खूशी कभी गम.
जूनी पानं गळून पडावी अन् नवी पालवी फुटावी हा निसर्गनियम. आपण त्या निसर्गातला छोटासा ठिपका. २०२४ याच संपूर्ण व्यवस्थेतलं एक छोटंस वर्ष. लीप वर्षामुळं कणभर जास्त वजनाचं.
३१ डिसेंबर एका संपलेल्या अध्यायातला शांत श्वास.
वर्षभरात जगण्याच्या धावपळीत हरवलेले क्षण आठवून,डोळ्यांत अलगद पाणी येते. काही स्वप्नं तगली,काही मोडली. काही हातातून निसटली. तरीही आपण पुढं आलोय,पुढे चाल्लोय अन् चालतच आहोत.
३१ डिसेंबर हा फक्त एका तारखेचा शेवट नाही. तो मनातलं अंतरंग जागं करतो. आपण जे गमावलं त्याला आदराने निरोप देण्याचा आणि जे हाती आलंय त्याचं कौतुक करण्याचा हा दिवस आहे.
वर्ष बदललं तरी फार काही बदलत नाही असं काहीजण म्हणतात. (कुछ तो लोग कहेंगे…)
मला सांगा उद्या ‘बुधवार’ आहे.
ना कुठल्या देवाचा वार आहे,ना वीकेंड आहे. तरीही उद्या नविन वर्ष सुरु होतंय म्हणून उत्साही वाटत असेलच ना? (“नसेल वाटत तर आपल्या सारखे आपणच कर्मकरंटे आहोत” हा पुलंच्या भाषेतला शालजोडा स्वत:ला मारा.)
एवढं पुण्य त्या बिचाऱ्या बुधवाराला मिळतंय हे पाहून यंदा ‘बुध’ग्रहावर सुध्दा जल्लोश होईल हे सांगायला माझ्यासारख्या नामधारी पंडिताची गरज नाही.
बस हाच बदल ‘नविन वर्ष’ दरवर्षी घेवून येत असते.
नविन वर्ष सुरु होईल. नवा उत्साह दरवळेल. नव्या वर्षात नव्या आव्हानांना सामोरे जायला नविन मार्ग सापडतील.
या नव्या पुस्तकाचा सुगंध पुन्हा प्रत्येकाच्या मनाला लहान करेल.
अन् लहान मुलांचा उत्साह,निरागसपणा पुन्हा नव्याने जगायला मदत करेल.
या सरत्या वर्षात बरंच काही शिकता आलं. माणसं जोडली गेली,शिकवत राहिली.
काही दिग्गज माणसं आपल्यातून कायमची निघून गेलीत. त्यांचा सुहास कायम दरवळत राहील. ते कायम आपल्या स्मरणात राहतील.
मी प्रयत्न केला. कधी पडलो, कधी खरचटलो, कधी धडपडलो. कधी एकटाच रडलो,कधी शांत शांत राहिलो. कधी हसलो,कधी कृत्रिम हसलो गेलो. एकट्या जीवाने जगण्याच्या अनेक छटा जगत राहिलो. कोणी सोबत नसलं तरी आपण आपल्या सोबत कायम असावं लागतं. तेच आपल्याला आपल्या असण्याचा अर्थ शिकवत असतं.
माझ्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. वर्षाच्या शेवटी तुम्ही क्षमा कराल हि विनंती करतो.
पुढचं वर्ष आयुष्यात नवी जिद्द,नवा उत्साह,नव-नवा आनंद घेवून येणार आहे. नव्या स्वप्नांच्या मागे धावताना नवं बळं अंगात असणार आहे. या सगळ्या नव्या गोष्टी होत असताना निर्मलाकाकूंनी मनाचा निर्मळपणा दाखवत त्यावर नवा GST कर लावायला नको बस्स एवढंच.
बाकी २०२५ मध्ये मोजून ३६५ दिवस असतील. कमी नाही की जास्त नाही, अन् तब्बल ५२ रविवार आहेत.
एवढं भविष्य मी नक्कीच सांगतो. त्यात काही दिवस थोडे त्रासाचे असणारच पण मग आपल्याकडे सुट्ट्या, सणवार काही कमी नसतातच. मस्त पुरणपोळ्या,चिकन,मटन असलं नियोजन झालं,खरेदी झाली की दिलखुश होवून जायचं. झालं तर मग. असच मस्त जगत राहायचं.
उद्या लवकर उठा,किमान उद्यातरी आंघोळ करा आणि थोडं मनापासून स्वत:ला ॲप्रेशिएट करा.बघा उद्याच्या बुधवारपासून दररोज असं करत राहिलात तर सर्व राशीच्या लोकांना २०२५ जबरदस्त जाणार.
साक्षात ‘बुधदेव’ मदत करणार.
हसा…हसत राहा…हसत हसत २०२४ ला निरोप देवून २०२५चे स्वागत करा. सर्वांना नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️
चरैवती…चरैवती…
चालत राहा…चालत राहा…
©सुजित
३१ डिसेंबर २०२४
Agadi yogy
ReplyDeleteThank You 😊
DeleteMastsch...Felt like talking and discussing these thing with you..
ReplyDeleteOhhh…it’s a compliment for me..thank You 🤗
ReplyDelete👌
ReplyDelete🙏🏼😊
DeleteKhup chan lihilay Sujit.... Happy new year 🎉 ✨️
ReplyDeleteHappy New Year Anagha🤗🤘🏼
Deleteवा मस्त लिहिलंस. नवीन सुखांच्या स्वागतासाठी जुन्या सुखदुःखाच्या फुलांचे खतपाणी नव्या वर्षाच्या पोषणासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास तुझ्या लेखणीतून मिळाल्याचा सुखद आनंद सुखावणारा आणि समाधान देणारा आहे.
ReplyDeleteधन्यवाद सुम्याभावा…❤️ एका कवी मनाच्या लेखक मित्राची दाद मनाला उभारी देवून जाते.🤞🥰❤️🙏🏼
ReplyDeleteHappy new year 2025🎊🎉
ReplyDeleteHappy New Year 🤗❤️
DeleteVery nice gist of year 2024 khup sujit bhava
ReplyDelete