कवितेचा वळिव
वपु म्हणत, “पाऊस जरी सर्वत्र पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं.”
मला देखील असं वाटतं,”पाऊस जरी सारखा दिसत असला तरी प्रत्येकाचे त्याच्याकडे बघणे वेगळं असतं,चित्रकाराला तो रंगीबेरंगी दिसतो तर कवीला तो बोलका मित्र वाटतो.नावाड्याला तो वेगळा मार्ग दाखवतो तर गावगाड्याला वेगळी दिशा.
वळवाचा पाऊस! मला तो जसा भावला तसा मी तो लिहिला...वेगळं भिजणं अन् भिजून चिंब होणं कोणाला नाही आवडत??
शिल्प-कल्पनेतून काव्य,कविता जन्मते,
ओवींमधून,ओळींमधून ती दुडूदुडू रांगते,
चालते,धावते,अडखळते नी पडते,
राहूनी पुन्हा उभी मिठू मिठू बोलते..
जाणते,नेणते सकल जना-मनाचे भाव,
करते विद्रोहातून अन्यायावर वर्मी घाव!
काय असते आत ‘पवित्र गर्भात’ तिच्या?
लृप्त-सुप्त-दिप्त ‘वाड्ग्मयाचे’ नाव.
संस्कारते ती अक्षर आणिक गोंजारते शब्द ओठी,
आमरसाचे सत्व,तिच्या रसाळ हापूस गाठी.
काय तो गोडवा जसं कैरी-पन्ह्यांचं काव्य,
सुखावतात ओठ-कंठ पिऊन पाचक द्रव्य.
अवेळी कैद घरट्यात,मानवी प्रजातीचा पक्षी,
जगतोय कसाबसा वा रडतोय ओक्साबोक्सी.
भटकतोय रात्रंदिन बहाद्दर,’आभासी’ या जगती
कैसेची वर्णावी, ‘मुठभर’ आयुष्याची महती?
उच्छवासानंतर आहे गाळून प्यायलेला श्वास,
काळ्या मातीत दरवळे ‘ओल्या मायेचा’ सुवास.
आतूर सदनी लाभो,तुझा बोलका सहवास.
साथ सोबतीत आहे,नातं जगण्यातलं खास.
चिंब चिंब कल्पनेत,बरसे अंगणी साजणी,
भेटावयास तुला ओंजळित आलं,‘वळिवाचं पाणी’!
गुंजतात हळूवार कानांत,भिनभिनतात स्पंदनात,
गडगडाटात गुणगुणतात धुंद पावसाची गाणी!
-सुजित

हा पाऊस आवडला बुवा आपल्याला.... आपण भिजून घेतलं यात...
ReplyDeleteअलग सलग प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद खाडे महाराज.🙏🏼😃
Deleteपावसांत भिजताना नक्कीच ही कविता. आठवणार.. सुंदर.👌👌👍👍
ReplyDeleteपावसात भिजताना काळजी घ्या..सर्दी खोकला झाल्यास कवी जबाबदार राहणार नाही😂😂
ReplyDelete