मोडून पडलीय फ्रेम...
मोडून पडलीय फ्रेम, पण जरा गरजच् होती म्हणूया, नुसतीच साचलीय धुळ, थोडी नजर बदलून बघूया.. विकत घेवून आपट्याची पानं, सोनं म्हणून वाटूया... सीमोल्लंघनानंतर आमच्याच् रस्त्यावर, कचऱ्याचे ढिग रचूया... ठार जाळूया रावणाला, जरा जास्तीच आहे त्याला अहं! सापडतोय का आत आपल्या, प्रेम करणारा राम? देवळांची करूया गर्दी, भक्ती करुया थाटात... कचराच कचरा फेकून इतरत्र, संस्कृती जपूया जोरात! उत्सवी असावं मन, ना की गोंगाटणारं रान! डाॅल्बीवाल्या ‘रामा’ थोडं, प्रदूषणाचं राख भान! © सुजित शुभदसरा🍀

मनाला हळवरणारी गोष्ट... खूपच सुंदर...👌👌👌👌
ReplyDeleteथॅंक्स अनघा...😊
ReplyDeleteनेहमी प्रमाणे अप्रतिम शब्दरचना💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद निलेशराव🙏🏼😊
ReplyDeleteDolyasmor ti ghatana ubhi rahili an vedanahi manat !
ReplyDeleteथॅंक यु शब्दप्रणाली🙏🏼☺️
ReplyDeleteSubscribe करतांना खुपचं कठीण करून टाकले आहे एव्हढं तर atm मधून पैसे काढतांना सुद्धा सुरक्षा नसते
ReplyDeleteधन्यवाद गीत गुंजन🙏🏼🤗🤗
Deleteहृदयस्पर्शी
ReplyDeleteधन्यवाद श्रीकांतराव🙏🏼
Delete