साठी
साठी.योगायोग म्हणजे त्याचा जन्म ६० चाच.देशाला स्वातंत्र्य मिळून १३-१४ वर्ष झाली असतील तेव्हा हा जन्मला,देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यापासूनपुढं होऊन लढणारा.जन्मापासूनच एकदम रांगडा पण कृष्णा-गोदासारखा सुंदर देखणा.शूरवृत्तीचा पण अभ्यासाने-विचाराने पुरोगामी.कष्टाळू अन् अर्थकारणात समाजकारणात सर्वांना सामावून घेणारा.लोकांच्या हाताला काम अन् कर्तृत्वाला ईनाम देणारा,नाव बनवणारा.लोककलेला दाद देणारा अन् आधुनिक कलेला नवा संवाद देणारा.नेतृत्त्वगुणसंपन्न पण तरीही कुटुंबाचा प्रमुख न होण्याचं शल्य मनात न धरतां शेती,उद्योग,सेवा या सगळ्याच क्षेत्रात कुटु्ंबाला नेहमीच लिलया प्रगतीवर नेणारा.आपल्या वेगवेगळ्या बोलीभाषेवर मनापासून प्रेम करणारा.कोकणच्या माश्यांपासून ते कोल्हापूरचा तांबडा-पांढरा,खानदेशातलं वांग्याच भरीत,मराठवाड्यातला गरगट्टा,विदर्भातल्या झणझणीत सावजीपासून ते सगळीकडच्या मिसळ, वडा-पाव वर आडवा हात मारणारा,पुरणपोळीवर तुपासारखा पागळणारा अन् चितळेंची भाकरवडी,सातारी कंदी पेढ्यापासून कुरुंदवाड-बेळगावच्या कुंदा आणि आमरसाच्या वाट्यांनी जीभेचं पाणी-पाणी करणारा हा पोट्ट्या, हिमालयाच्या मदतीसाठी छातीची ढाल होणारा.मर्दमराठा ‘हिंदकेसरी’!आज साठीतपण दख्खनची काळी सुपीक माती ललाटास लावून,एक पाय उंचावून हाताने पायावर थाप मारुन दिमाखात उभा आहे,अभेद्य!
वेरुळच्या लेण्यांमध्ये रमणारा,महाबळेश्वर -चिखलदऱ्याची थंड कुडकुडणारी सफर करणारा,मरीन ड्राइव्हवर भिजणारा-रोमॅंटिक होणारा,कोकणात समुद्रावर तासनतास रेतीत शिल्पं घडवणारा अन् इमान इतबारे शेतात घाम घाळून धान्य पिकवणारा.वर वर गावठी दिसत असला तरी लोखंडी नांगरापासून दोन-चारचाकी गाड्या एवढंच काय तर माझगाव डाॅक मध्ये मोठमोठी जहाजं अनं ओझरला हवेत उडणारी विमानं बनवणारा,आय टीतली ऐश करणारा पण तरी प्रत्येक दिवाळीला मोती साबणाने काया लेपणारा,धोतरापासून ते जीन्सपर्यंत फ्लेक्झिबल राहणारा.ताडोबातल्या वाघोबासारखा रुबाबदार अन् भीमाशंकरच्या ‘शेकरु’ सारखा चपळदार पळणारा, ‘ब्ल्यू माॅरमाॅन’ सारखा स्वच्छंदी दऱ्या-खोऱ्यात बागडणारा,सह्याद्रीमध्ये ‘ताम्हणा’ सारखाफुलणारा ,ऐन उन्हाळ्यात आंब्यांच्या मोहरुन जावून सुगंध दरवळणारा,त्याच तल्लीनतेनं शिवजयंती,गणेशोत्सव साजरा करणारा,आषाढीला पायाला उत्साहाची भिंगरी लावून पंढरीला जाणारा, स्वाभिमानी मरहट्टा.
जेष्ठ नागरीक होतोय तो आज.प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे मोठा होतोय,आता इथल्या लोकांना त्याने आखलेला-चाललेला‘सुज्ञ,विज्ञानवादी,पुरोगामी,सात्विक,प्रामाणिकपणा,धाडसी’ रस्ता पुन्हा पुन्हा दाखवतोय.जेष्ठत्वाकडून ‘श्रेष्ठत्वाकडे’ जायचा मार्ग दाखवतोय तो.
आज त्याचा वाढदिवस,एका अर्थाने कष्टाळू माणसाचा ‘कामगारदिनाला’ साजरा होणारा वाढदिवस हा खरोखर गौरवच आहे.सगळीकडे कडकडीतबंदआहे,पण बंद दाराआड देशाला दिशा देणारा नवा प्लॅन तो बनवत असेल...उद्याचा येणारा दिवस वासुदेवाची पहाटं पावलं अन् शाहिराचा डफासोबतचा पोवाडा यांचा सुगावा त्याला लागला असेल...अन् कुसुमाग्रजांच्या ओळी तो चहाचा घोट घेत गुणगुणत असेल..
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा,फक्त लढ म्हणा.”
© सुजित
१ मे २०२०,महाराष्ट्रदिन.
मुक्कामपोस्ट महाराष्ट्र.

खूपच छान... अति उत्तम👌👌... महाराष्ट्र दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद... जय महाराष्ट्र...🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद धन्यवाद अनघा...
Delete🙏🏼😁
भाई, सुंदर सफर झाली.शुभेच्छा!!
ReplyDeleteधन्यवाद भावा🙏🏼😁
Deleteएकच नंबर...
ReplyDeleteकुटुंब प्रमुख वाली ओळ अगदी काळजाचा ठाव घेऊन गेली...
धन्यवाद खाडेसाहेब.
Deleteकाळजात घर करन बसणारंच आपलं राज्य आहे.
मेजवानीच लिखाणाची 👌🏻👌🏻😘😍
ReplyDeleteआडवा हात मारा मग तुम्हीपण😁😁
Deleteआपलीच भाषा आहे,येवूद्या तुमची पण थाळी.
एकंदरीतच इतिहास,भूगोल,पर्यावरण,राजकारण,संस्कृती यांचा सुंदर मिलाफ दिसतोय लिखाणात.सुंदर...!!!
ReplyDeleteकुटुंबाच्या प्रमुख बाबतीत म्हणाल तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत साहेब म्हणाले होते मी काही म्हातारा झालेलो नाही अजून म्हणून.आमच्यासारखे खंदे कार्यकर्ते अजूनही वाट बघताहेत त्या क्षणाची जेव्हा दिल्ली च्या तख्तावर मराठी झेंडा असेल...!!!��
धन्यवाद.खरं तर महाराष्ट्राचे राज्य फुल,फुलपाखरु,प्राणी,वृक्ष,राजमुद्रा यांचा वापर मुद्दामहून विशेषनासाठी करताना मस्त वाटलं.
Deleteराजकारणात खरंच महाराष्ट्र जेव्हा दिल्लीचं तख्त सांभाळेल याचा वेगळा आनंद असेल.
महाराष्ट्रा,दीर्घायुषी हो,यशवंत किर्तीवंत हो.💐
सुजित मस्त लिहिले आहे...
ReplyDeleteधन्यवाद🙏🏼😁
DeleteKya baat hai..... @sujit bhai
ReplyDeleteThanks bhau🙏🏼😁
Deletemaharashtra jsa vaividhytetene natlela ahe tsach tuza lekhnahi !! vyanjanapasun te vividh sthalancha darshan ghadla hya lekhatun !
ReplyDeleteagadi rasayan :-)
धन्यवाद प्रणाली🙏🏼😁
ReplyDeleteमहाराष्ट्राच्या वैविध्याच्या सानिध्यात वाढता आलं,वाचतां आलं,मराठी अर्काचं रसायन प्राशन करता आलं यातचं माझ्यासारख्या पामरास एक वेगळं सुख अनुभवता आलं.☺️