थिम्मक्का

या नावाचा शब्दश: अर्थ मला माहित नाही...परवा परवा राष्ट्रपती भवनातपद्मपुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला,त्या वेळी थिम्मक्का हे नाव ऐकलं...सालुमरादा थिम्मक्का!

केवळ १०७ वर्षांची ही तरुणी,माझ्या आज्जी किंवा पणजीच्या वयाची आणि म्हणूनचएकेरीउल्लेख...आपलेपणा आणि प्रेम,दोन्हीही.

लग्नानंतर थिम्मक्काला मूल होत नव्हते,भारतीय समाजात मूलबाळ होणाऱ्या स्त्रीयांबद्दलइतर स्त्रीयाच्काय काय बोलतात हे आपण भारतीय जाणतोच,पुरुषांबद्दल न बोललेलं बर..थिम्मक्का पण हेच बोलणं ऐकायची,हळहळायची,धाय मोकलून रडायची...तिनेआत्महत्येचेकैक प्रयत्न पण केले,पण खंबीर नवरा सोबत होता,तो तिला आधार द्यायचा,तिची आसवं पुसायचा,कठीण काळात साथ देतं ते खरं प्रेम! त्यांनी नंतर एक मुलगा पण दत्तक घेतला...

आता खरी गोष्ट सुरु होते थिम्मक्का आणि तिच्या मातृत्वाची...कर्नाटकमधल्या ‘हुलीकाल वरुन आपली गाडी तर भरधाव वेगाने सुटते पण तेथेच थांबते ते आपले मन आणि शहारुन जाते ते ओजस्वी तन...आपल्या पतीसोबत तिने राष्ट्रीय महामार्गावर ३८५ वटवृक्षांची लागवड केली...चार किलोमीटरचा एक पट्टा वृक्षाच्छादित केला...अर्थात तिने राजकारण्यांसारखे वृक्षलागवडीचेदिखावू छायाचित्रणनाही केले...
ज्या नवऱ्याने तिला या प्रकारचेमातृत्वअनुभवायास सहाय्य केले तो अवलिया इथे आवर्जून नमूद करावासा वाटतो..’बिकालू चिकय्या’ ,तिला आधार देणारा तिचा वटवृक्ष!
एकमेकांची साथ दिली तर पुन्हा मातीत रुजतात आणि वडाला वडिलांसारखं आधार देतात त्यापारंब्याकिती खणखर असाव्यात याची जाणिव यासदाबहारजोडप्याकडे बघून होते...

यावरच हे जोडपे थांबले नाही,त्यांनी ८००० हून अधिक इतर झाडे देखील लावली,जगवली आणि पोटच्या पोरांप्रमाणे प्रेमाने वाढवली...
तिला मिळालेले पुरस्कार विकीपेडीयावर समजतीलच,पण समजणार नाही तिचं वात्सल्य.

निमित्तमात्र आहे थिम्मक्का...पण तिची उर्मी खूप ठिकाणी भेटत राहते...
‘102 not out’ मधलाअमिताभ नजरेसमोर येतोय,शंभरी मारल्यावर देखील चित्त शांत ठेवून त्याच उत्साहाने खेळणारातेंडूलकरइथेच सापडतो,आणि आठवते तेबेंजामिन फ्रॅंकलिनचे ते अजरामर वाक्य-‘“Many people die at twenty five and aren't buried until they are seventy five.”

थिम्मक्का,तुझ्या कार्याला सलाम द्यायला सोशल मिडिया पुरेशी नाही,पुन्हामातीसंगे प्रीत जुळवून शुध्द  बीजापोटी अंकुर रुजवले आणि डेरेदार वृक्ष बहरावलेतरच माझ्या मनाचीफलसिद्धीहोईल...

ज़ुग ज़ुग जीयो थिम्मक्का😍


©सुजित

Comments

  1. शब्दातून जागवलेल्या स्मृतींमधून दिलेली मानवंदना थिमक्का नि रोवलेल्या बिजांची मूळ खोलवर रुजल्याचं आत्मिक समाधान थिमक्का आणि त्यांच्या वटवृक्षाला नक्कीच करून देतील.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल