Posts

Showing posts from 2019

चायराम

Image
Cutting  ☕️ .     ‘ चायरामां ’ साठी   प्रत्येक   दिवस  ‘ आंतरराष्ट्रीय   चहा   दिवस ’  असतो ... प्रत्येक   प्रांतानुसार   चहा , त्याची   चव , रंग , फ्लेवर , आणि   महत्वाचं   म्हणजे   किंमत बदलते ... आसामचा  ‘Golden Butterfly Tea’  आणि   अरुणाचल   प्रदेशचा  ‘Golden Needle’  यंदा   ७५०००   प्रतिकिलो   दरात   लिलावात   विकले   गेले या वरुन   उंची   मद्याच्या   किंमतीशी   चहा   टक्कर   देतोय   हे   दिसून   येतेय . भारतात   पहिला  GI tag ( भौगोलिक   नामांकन )  मिळवण्याचा   मानदेखील   चहालाच जातो , दार्जीलिंग   चहाने   हे   बिरुद   पहिल्यांदा   मिळवले   होते .      चहासाठी   पाण्याचा   निचरा   होणारी   उतारावरची   जमिन   लागते , वर्षांला   किमान   सरासरी   १००   सेमी   पाऊस  ...

एक पाऊल

Image
त्यांच्यासाठी   एक   पाऊल   धावशील   का ? भूकेल्या   जीवांना   चार   घास   देशील   का ? नको   त्यांना   तूप   रोटी   किंवा   श्रीखंडाची   वाटी , पण   शांत   झोपेसाठी   चार   घास   दररोज   देशील   का ? रुपयाच्या   चिल्लर   वर   नाहित   सुटत   प्रश्न ! जगणं   अशक्य   त्यांचं , पण   नजरेत   असतीलच   कि   स्वप्न ! उद्यातरी   त्यांना   प्रेमाने   तू   गोंजारशील   का ? डोळ्यातलं   पाणी   त्यांच्या   पुसशील   का ? दाहीदिशा   दिवे   जळतात   तुझ्या   गाभाऱ्यात , मार्गात   त्यांच्या  ‘ उजेड ’  पाडशील   का ? काळोखात   भटकणाऱ्या   तुझ्या   लेकरांसाठी , कर्तृत्वशाली  ‘ मशाली ’  तू   पेटवशील   का ? त्यांच्यासाठी   एक   पाऊल   धावशील   का ? तूच   कर्ता   आणि ...

मोडून पडलीय फ्रेम...

Image
मोडून पडलीय फ्रेम, पण जरा गरजच् होती म्हणूया, नुसतीच साचलीय धुळ, थोडी नजर बदलून बघूया.. विकत घेवून आपट्याची पानं, सोनं म्हणून वाटूया... सीमोल्लंघनानंतर आमच्याच् रस्त्यावर, कचऱ्याचे ढिग रचूया... ठार जाळूया रावणाला, जरा जास्तीच आहे त्याला अहं! सापडतोय का आत आपल्या, प्रेम करणारा राम? देवळांची करूया गर्दी, भक्ती करुया थाटात... कचराच कचरा फेकून इतरत्र, संस्कृती जपूया जोरात! उत्सवी असावं मन, ना की गोंगाटणारं रान! डाॅल्बीवाल्या ‘रामा’ थोडं, प्रदूषणाचं राख भान! © सुजित शुभदसरा🍀

पतंग

Image
हि संध्याकाळ आहे फ्रांस नावाच्या एका युरोपिअन राष्ट्रामधली ... श्रीयुत मार्टिन आपल्या १० वर्षांच्या सॅम ला कारमध्ये घेऊन पठाराच्या दिशेने रवाना झाले ... सगळीकडे हिरवळीने मनोहारी दृश्य नजरेत पडत होते .. रेंगाळत होते आणि मनाच्या स्पंदनांना उल्लासित करत होते .. इप्सित स्थळी पोहोचल्यावर सॅम ने टुणकन कारमधून बाहेर उडी मारली ... पाठीमागील सीटवरील पतंग आणि मांजा घेऊन श्री मार्टिन सॅमच्या पाठीमागे धावले ... " डॅड .. माझ्या सूचनांना फ़ॉलो करा " सॅमने आज्ञा सोडली ... " येस युव हॉनर " म्हणत श्री मार्टिन यांनी मान झुकवली . " डॅड ... आय वॉन्ट टू फ्लाय हाय , मोअर अँड मोअर हाय " क्षणांत तो पतंग उंच आकाशी घिरट्या घालू लागला ... एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणे गिरर्कन खाली येणाऱ्या कागदी तुकड्याला सॅम सावरत होता .. हवेच्या झोकानूसार आवरत होता ... श्री मार्टिन लहानग्या मुलासोबत लहान होऊन यथेच्छ आनंद उपभोगत होते ... अर्जूनाच्या भूमिकेत सॅम पतंगाला ढील देत होता तर ...