चायराम
Cutting ☕️.
‘चायरामां’साठी प्रत्येक दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ असतो...प्रत्येक प्रांतानुसार चहा,त्याची चव,रंग,फ्लेवर,आणि महत्वाचं म्हणजे किंमत बदलते...आसामचा ‘Golden Butterfly Tea’ आणि अरुणाचल प्रदेशचा ‘Golden Needle’ यंदा ७५००० प्रतिकिलो दरात लिलावात विकले गेले या वरुन उंची मद्याच्या किंमतीशी चहा टक्कर देतोय हे दिसून येतेय.भारतात पहिला GI tag (भौगोलिक नामांकन) मिळवण्याचा मानदेखील चहालाच जातो,दार्जीलिंग चहाने हे बिरुद पहिल्यांदा मिळवले होते.
चहासाठी पाण्याचा निचरा होणारी उतारावरची जमिन लागते,वर्षांला किमान सरासरी १०० सेमी पाऊस लागतो आणि उष्ण व आर्द्र वातावरण लागते.
चहाचा शोध सर्वात प्रथम ख्रिस्तपूर्व २७३७ साली श्री.शेन नोंग या चिनी इसमास लागला,झालं असं शेनभाऊ ते आपल्या बागेत पाणी उकळतहोते,अपघाताने काही पानं त्यात पडली,त्याचा झाला चहा!आज पुढची प्रक्रिया आपल्याला माहित आहेच!
इंग्रजांनी चहा भारतात आणला,मोठ्या बागा वसवल्या,तेव्हाचे फॅक्टरी ॲक्ट चहाच्या मळ्यांना लागू नव्हते,कारण स्वच्छ आहे,चहाच्या मळ्यातल्या कामगारांच शोषन करता यावं.
मग चहामध्ये दूध का टाकलं जाते?कधीपासून ?
तर नंतर असं लक्षात आलं (१६/१७ व्या शतकात)की चहाच्या उकळत्या पाण्याने कप तडकतात,ते थंड करण्यासाठी त्यात दूध टाकलं जाऊ लागले,ब्रिटिशलोक आजही कपात आधी दूध ओततात मग कोरा चहा,पण आम्ही भारतीयांनी पातेल्यातच दूध टाकून उकळायला सुरुवात केली,अर्थात ते रसायन देखील मस्तच जमलं.दूध टाकल्यानंतर एका मिनिटात चहाचा गॅस बंद केल्यास चहा सर्वोत्तम बनतो असं एका जाणकाराकडून मी ऐकलं आहे.अर्थात हिमाचलप्रदेशच्या पहाडी भागांत मिळणारा चुलीवरचा चहा देखील वेगळ्या चवीचा असतो,छान लागतो.
चहाचं अर्थशास्र प्रचंड मोठ्ठ आहे,(येथे येवले चहाच्या किती फ्रॅंचायजी आहेत आणि पर हेड १०/कप च्या हिशोबाने दिवसाला किती धंदा होतो,गुणिले ३६५हे करत बसु नका) जगात चीन सर्वात जास्त चहा पिकवतो व वापरतो देखील,नंतर क्रमांक लागतो भारताचा! भारतात हिमालयीन रांगांच्या खालच्या भागांत हिमाचल प्रदेश पासून ते अरुणाचल प्रदेशच्या ‘दुआर’ पर्यंत आणि दख्खन मध्ये कर्नाटक,केरळ,तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथे चहाचे उत्पादन घेतलेजाते.
आसाम मध्ये सर्वाधिक म्हणजे भारताच्या एकूण उत्पादनाच्या ५२% उत्पादन होते,दिब्रुगढला भारतातील ‘चहाचे शहर’ म्हणतात.तर आसामला ‘चहाचीबाग’.
ईशान्येकडच्या चहा पट्ट्यामध्ये स्वतंत्र असा Timezone आहे-‘बगान वेळ’ कि जी भारतीय प्रमाणवेळेपेक्षा(IST) एक तास पुढे आहे.
चहाचे आज ब्रॅंडिंग प्रचंड प्रमाणात होत आहे,CCD नंतर आज T spot,Tata Chai Cafe,Jayka,येवले,साईबा,प्रेमाचा,पालखी दरम्यानचा सागर चहापासून टपरीवरचा,कॅंटीनॅधला,रेल्वेतला,विमानातला....ते अगदी स्वामीचा आल्याचा,पत्रकारभवनच्या काकांचा स्पेशल चहा,मारामारी चहा,दिल्लीतला कुल्हडवाला अन् पुणेरी अमृततुल्य पासून इराणी चहापर्यंत वेगवेगळे प्रकार आहेत.आजकाल CCD सारखं चहाचे कॅफे सुध्दा डेटिंगसाठी पर्याय बनत आहेत उदा चायकट्टा,टिळकरोड.
टाटा टी ने बनवलेली ‘हर सुबह सिर्फ उठो मत,जागो रे’ ही जाहिरात अजून लोकांच्या लक्षात आहे.
चहावरंच प्रेम मधुमेह झाल्यावर पण आटत नाही,फक्त साखर कमी होते चहातली इतकचं.ग्रीन टी,लेमन टी ची नावं अजून इंग्रजी आहेत,ज्या दिवशी मराठी विशेष:त पुणेकर त्यांच मराठी नामकरण करतील तेव्हा नक्कीच वाचताना गंमत येईल.
बाकी भारतात चहावर किती प्रेम आहे हे वेगळं सांगायला नको,इथं एक चहावाला(ले) पंतप्रधानपदी आम्ही निवडून दिलेत यातंच सारे चहाप्रेम आले.आणि‘चहावाल्यावरचा राग आम्ही लोकशाहीने मार्गाने काढायला साखरवाल्यांना कसं निवडून दिले’ यावरच्या गप्पा चहा पिताना तमाम मराठी माणसं मारताना दिसत आहे.
चला...मस्त चहा बनवा,चहा दिवस साजरा करा,पुणेकरांसारखे “चहा घेवून आलेलं दिसताय” असं म्हणून चहाप्रेमींना चहा नाकारु नका(विनोद!)
तुम्हाला आवडलेली चहाची ठिकाणं नक्की सांगा.फोटो अपलोड करा.
चांगभलं Cheers ☕️☕️.
©️सुजित पंडित

👍🏽👍🏽👍🏽
ReplyDeleteधन्यवाद🙏🏼☺️
Deleteउत्तम...!!!
ReplyDeleteधन्यवाद चाय पार्टनर.
DeleteHey khadus mast write kele ahes....
ReplyDeleteथॅंक्स महाखडूस.
DeleteChaha sathi khi pn na
ReplyDeleteHoy..😂
Delete