पतंग

हि संध्याकाळ आहे फ्रांस नावाच्या एका युरोपिअन राष्ट्रामधली...श्रीयुत मार्टिन आपल्या १० वर्षांच्या सॅम ला कारमध्ये घेऊन पठाराच्या दिशेने रवाना झाले...सगळीकडे हिरवळीने मनोहारी दृश्य नजरेत पडत होते..रेंगाळत होते आणि मनाच्या स्पंदनांना उल्लासित करत होते..इप्सित स्थळी पोहोचल्यावर सॅम ने टुणकन कारमधून बाहेर उडी मारली...पाठीमागील सीटवरील पतंग आणि मांजा घेऊन श्री मार्टिन सॅमच्या पाठीमागे धावले...
"डॅड ..माझ्या सूचनांना फ़ॉलो करा" सॅमने आज्ञा सोडली...
"येस युव हॉनर" म्हणत श्री मार्टिन यांनी मान झुकवली.
"डॅड... आय वॉन्ट टू फ्लाय हाय,मोअर अँड मोअर हाय"
क्षणांत तो पतंग उंच आकाशी घिरट्या घालू लागला...एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणे गिरर्कन खाली येणाऱ्या कागदी तुकड्याला सॅम सावरत होता..हवेच्या झोकानूसार आवरत होता...श्री मार्टिन लहानग्या मुलासोबत लहान होऊन यथेच्छ आनंद उपभोगत होते...अर्जूनाच्या भूमिकेत सॅम पतंगाला ढील देत होता तर श्रीकृष्ण असलेले श्री मार्टिन दोरीचे सारथ्य करत होते....क्षितिजाच्या त्या समांतर किरणांनी क्रीडांगण चमकत होते...
"डॅड...अजून दोरा सोडा..."
"इट्स ओवर माय डिअर सन! आपण आहे एवढ्या दोरीमध्येच एन्जॉय करूयात..."
"नो...आय वॉन्ट मोअर,कट दि स्ट्रिंग"
अर्थात श्री मार्टिन ने सॅम ला पुनश्च विनंती केली पण बालहट्टापुढे त्यांची डाळ शिजली नाही..त्यांनी दोरा कट केला...उंच उंच जाणाऱ्या पतंगासोबत सॅम खदखदून हसू लागला...अन अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत तो पतंग आभाळमाया सोडून अदृश्य झाला..सॅमच्या चेहऱ्यावरची हास्याची कळी क्षणांत कोमेजली...तेवढ्यात श्री मार्टिन स्मित हास्य करत सॅमच्या पुढे आले...
"व्हॉट हॅप्पन डॅड...तूम्ही असूरी हास्यात काय रंगलाय..?"
अर्थात तेअसूरी हास्यनव्हतंच मूळी... एक धडा होता वास्तवातला,मर्यादेचा,अभिव्यति स्वातंत्र्याचा आणि बंधनाचा !
"स्वातंत्र्यावर काही बंधनं नसली कि स्वैराचार आकारास येतो आणि सूर्यास्तसुद्धा !"
हळूहळू श्री मार्टिनचे बोल सॅमच्या बालमनावर कोरले जात होते..एका कठोर क्षणावेळी सॅम आयुष्यातला महत्वाचा धडा आत्मसात करत होता...मावळतीच्या दिनकराला हात जोडून सॅम श्री मार्टिन सोबत दंगामस्ती करत घरी परतत होता...पुन्हा हसून खेळून जगायला शिकत होता...


©सुजित

Comments

  1. खूप छान सुजित.... वाचताना मॅन हरवून गेलं होतं☺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल