फिर मिलेंगे चलते चलते...

           रिमझिमणाऱ्या सरी अंगावर झेलत पाऊले झपाझप पडत होती,केसांच्या पात्यावर दवबिंदू अलगद साचत होते...अन् हेडफोनमधून वाजणारं अरिजित सिंगच्या 'ए दिल है मुश्किलच्या' धुंदीत मी आपल्याच तंद्रीत 'Z Bridge' च्या बाजूच्या पात्रातून 'हिरवळ' बघत चाललो होतो...अचानक समोर आलेल्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच माझ्या भुवयांच्या कडा नकळत उचलल्या गेल्या,एव्हाना त्या प्रसन्न चेहऱ्याने एक गोड smile दिलेली होती....आकस्मित मिळालेल्या जादूच्या झप्पीमुळे पावलांचा वेग मंदावून हृदयात टिक टिक वाजत होती,वाढत होती !

Hii (मी थोड्याश्या हळू आवाजात पुट्पुटलो...)
समोरून काहीच reply आला नाही..(सरसर अंगावर रोमांच उभा राहिला..!)
थोडं daring करून मीच जवळ गेलो आणि पुन्हा shake hand साठी हात पुढे केला,
फ्रॅक्चर झालेला हात सावरत समोरून हात पुढे आला...ओळख परेड झाली अन हळुहळू गप्पांचा फड रंगत गेला...
नुकत्याच झालेल्या event मुळे 'गणपतराव' थकलेले होते,विसर्जनाच्या वेळी दुसऱ्या मंडळाकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे एक दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते,काहीश्या नाराज mood मधेच कण्हत कण्हत हालचाल करत होते...पहिल्यांदाच एवढा मोठ्ठा बाप्पा मला थोडा थकलेला दिसला !
"बाप्पा कसा वाटला यंदाचा जलवा ?"
Cutting चहाचा घोट घेत बाप्पा 'याड लागलं' च्या चालीवर डुलू लागला..
"मग मोदकावर मनसोक्त ताव मारलास ना..?"
पोटावरुन हात फिरवून dieting च्या सुरात बोलला...."ढीगभर खुराक नजरेच्या टापेत मावत नव्हता,पण रस्त्यावरच्या आकसलेल्या भुकेल्या पोटांना महागाईच्या तडाख्यात चार घास देऊ शकत नव्हतो म्हणून माझ्याच लंबोदराचा मला राग येत होता.."
"चलता है भाई....इतका serious कशाला होतोय...चिल मार..!"
"चिल..?"
"गेले दहा दिवस डॉल्बीच्या उंची आवाजावर माझीच गाणी वाजवत होती,थोडा कमी करा म्हणणार तेवढ्यात 'आवाज वाढव dj तुला आईची शपथ आहे' म्हणून emotional करत होती.'उत्सवमूर्ती' मी आहे का ते , हे समजायला पण कान सुन्न करून टाकले होते.."
"बाप्पा,plz बोल ना रे....आपल्या लेकरावर का कोणी नाराज होत असतं?"
"लेकाच्या,जस तुमच्या generation ने आई वडिलांच्या घरातल्या अस्तित्वाला कस्पटासमान प्रदूषण समजायला सुरुवात केलीय तसंच माझ्या मूर्त असण्याला गल्ली बोळांतल्या माझ्याच रुपातल्या 'स्वयंघोषित राजांनी' स्पर्धा म्हणून पर्यावरणाच्या नासधूकीची मुहूर्तमेढ रोवली आहे याचंच मनाला शल्य वाटतंय बघ",बाप्पा थोडा चिंतीत सुरात बोलला..!
"Sorry,चुकलो...."
"चुकलो..."?माझं वाक्य अर्ध्यातच तोडत बाप्पा त्वेषाने खेखसला,
कुडमूड थोबाड चोरून चोरून मी लपवायला लागलो..
"look at me"अस म्हणून खांद्यावर हात ठेऊन बोलला...
"English hmm?" म्हणून मी पुन्हा चेष्टा करायला लागलो...
क्षणात पोटातला राग सांडून, तुटलेला एक दात बाहेर काढून बाप्पा जोरजोरात हसायला लागला !"facebook, WhatsApp अन् selfi मुळे मी पण थोडा hightech झालोय,गल्लीपासून दिल्लीपर्यंत अन् वावरातल्या बांधापासून आकाशातल्या चंद्रापर्यंत पोहोचलोय.."
"Hmm good.."मी कुजबुजलो.
"मग,तुला चिक्कार राग आला असेल ना माणूस जमातीचा?"
"छे छे...थोड्या गाळाने का समुद्र नाहीसा होतो?"
"म्हंजे?"
"अबे लेका,चिमूटभर माणसं माझ्या वर शांताबाई,झिंग झिंग झिंगाटचा भोंगा धरून राहिले म्हणून मी काय बहिरा होतो का बे?"वेगळ्या विदर्भाच्या चालीमध्ये बाप्पा पुटपुटला..
"शेकडो कलाकारांच्या हातांना कल्पकता सुचत होती,कोणी निस्वार्थीपणे सर्वांची सेवा करत होते,कोणी सरळ मार्गाने आभाळ कष्ट उपसत होतं तर खाकी कपड्यातली माझी लेकरं 'सदरक्षनाय' डोळ्यांत तेल घालून चोवीस तास आपली duty चोख बजावत होते तेही कोणत्याही प्रसादाच्या अपेक्षेशिवाय !"
"फार दुखतोय का हात?" topic change करत मी विचारले.
"Hmm पर्याय नाही,धक्काबुक्कीचे घाव सोशल्याशिवाय का मला देवपण प्राप्त होणार आहे?"
स्वतःच्या dialogue वर बाप्पा 'भाऊ कदम' सारख दात काढत पोटधरून हसला..!
"चल, निघायला पाहिजे,कधी नाही ते दुथडी भरून वाहणाऱ्या 'मुठेच्या' प्रवाहात सामील होऊन 'हिंदी महासागरात' bed rest घ्यायची आहे..."
काहीसं नाराज होत मी मात्र हक्काने खोल आवाजात अडवून विचारले "परत कधी भेटायचे?"
आनंदाने बाप्पा म्हणाला "मौका मिळाला कि प्रत्येक चौकात "फिर मिलेंगे चलते चलते..!"

-सुजित पंडित.



Comments

  1. Masstch Re ... !! It's Nice to see you here ! Aata tuzya kavita pan yeude ek ek karun !

    ReplyDelete
  2. उत्तम लेखणी आणि हास्य रस चांगला मिसळला आहे...

    ReplyDelete
  3. Thought farach bhari hota . Ganeshotsav che negative barech loka lihitat pan tyala hi shewati tu positive karun faar bhari feel dilay . Bhidala t mala ekdam .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल