हरवलेले शब्द
बोलण्यासाठी हवेत शब्द,
टाळण्यासाठी रुक्ष शांतता,
हरवते कोसोदूर चित्ती,
मनातल्या भावनांची गर्तता…!
दाटते रेशमी दाट धुके,
ओठांत रुते शब्द मुके,
अबोल हृदयात वाजे,
टिकटिकीचे असंख्य ठोके…!
आस लागे मनांत,
मन हरवते आसमंत,
न लागे कशास थांग,
लांब लांब अंतर अनंत…!
कल्लोळ म्हणावा की अन्य,
बेरीज-वजाबाकी शून्य,
कशात होई धन्य,
कोडं हे सुटेना..!
बोलावे कि राहावे अबोल,
शिरावे का इतके सखोल?
कि चालत राहावे भूगोल?
भेटे पृथ्वी बोलता बोलता गोल..!
देह मनाचे आगार,
मन विचारांचे भांडार,
मेळ घालूनी सत्वर,
फिरवावा मैत्रीचा नांगर..!
याची मनांतले श्लोक पुरे,
कितीही बोलता पडे अपूरे,
चिरंतन राहो आनंदी हसरे,
संवादातले सजीव चेहरे..!
©सुजित
सरलतेला तरलतेची अचूक जोडणी....
ReplyDeleteभावनांची फोडणी दिली अन् सरल तरल झाली जोडणी..🤭
DeleteItaka kay sangaycha ahae tula .....mala sang baba 😜😜
ReplyDeleteभेटा भेटा…सांगतो सविस्तर…😂
Deleteखुप छान..👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद अनघा🙏🏼☺️☺️
Delete