चरैवती



वाट सरते दूर,
पण प्रवास संपत नाही!

मन होई बेभान आतुर,

वाट चालतच् राही..!


काळ-वेळ लांबते,

पण घड्याळ थोडीच थांबते?

पावलं सरकत सामोरी,

मृगजळ भिजवून जाते..


लख्ख किरणांचा भास्कर,

प्रकाश नांदत ठेवतो...

खोल रुतलेल्या अंतरी,

कवडसे बरसत राहतो...


चांदण्या शीतल सख्या,

काजवे तराळती भोवती,

एकेक दिवा विझे,

वातीचा धूर अंती!


वाट चालतच् राही,

परंतू देह थकत नाही,

आटलेल्या गोड विहिरीत,

डबके कधी होत नाही!


वाट लांबलांब जाई,

यावी ऐकाया अंगाई,

पक्षी लहान जीवाचा,

थव्यासंगे उडून जाई...


प्रवासी पावलांची पायवाट...

चालतच् राही...चालतच् राही...



© सुजित

१४/०७/२०२१




Comments

  1. मस्तच... Very suitable title चरैवती... 👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भावा😊
      चरैवती चरैवती!!

      Delete
  2. Atishay sunder vichar n shabdrachana Sujit👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you शब्दप्रणाली😊

      Delete
  3. खुप छान...👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनघा😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडून पडलीय फ्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

विठ्ठल