Posts

Showing posts from 2021

चरैवती

Image
वाट   सरते   दूर, पण   प्रवास   संपत   नाही ! मन  होई  बेभान   आतुर , वाट   चालतच्   राही ..! काळ - वेळ   लांबते , पण   घड्याळ   थोडीच   थांबते ? पावलं   सरकत   सामोरी , मृगजळ   भिजवून   जाते .. लख्ख   किरणांचा   भास्कर , प्रकाश   नांदत   ठेवतो ... खोल   रुतलेल्या   अंतरी , कवडसे   बरसत   राहतो ... चांदण्या   शीतल   सख्या , काजवे   तराळती   भोवती , एकेक   दिवा   विझे , वातीचा   धूर   अंती ! वाट   चालतच्   राही , परंतू   देह   थकत   नाही , आटलेल्या   गोड   विहिरीत , डबके   कधी   होत   नाही ! वाट   लांबलांब   जाई , यावी   ऐकाया   अंगाई , पक्षी   लहान   जीवाचा , थव्यासंगे   उडून   जाई ... प्रवासी   पावलांची   पायवाट ... चालतच्   राही ... चालतच्   राही ... ©  सुजित १४/०७/२०२१

महाराष्ट्राची एकसष्टी

Image
सह्याद्रीची  मनमोहक  निसर्गसृष्टी , अंबोलीची  धोधो  पर्जन्यवृष्टी , लोणारची   उल्कापत्ती , वेरुळची   त्रिमिती , मुंबईची   सिएसएमटी ! महाराष्ट्राची   एकसष्टी !   मला   महाराष्ट्राचा   नकाशा   उभा - आडवा   पाहिला   की   भारताचा   नकाशाच   वाटतो . अगदी   तंतातंत   बिलकुल   नाही   पण   कन्याकुमारीचा   द्विपकल्प   जसा   निमुळता  आहे   तसा   तळकोकणात   महाराष्ट्र   आहे . मग   आंध्रात   एका   वळणानंतर   बंगालपर्यंत   सरळ   भूभाग / किनारपट्टी   आहे , तसा   भूभाग   कोल्हापूर - सांगलीपासून  यवतमाळपर्यंत   आहे . थोडं   पलीकडे   ईशान्यतल्या   मिझोरमची   तटबंदी   आहे   तसा   गडचिरोलीचा   देखील   अभेद्य   बुरुज   आहे , पश्चिमेकडे   भारताची   अन्   राज्याची  सीमा   अरबी   समुद्रास   एकत्रित   भेटते . वायव्य...