Posts

Showing posts from May, 2020

कवितेचा वळिव

Image
वपु म्हणत , “ पाऊस जरी सर्वत्र पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं .” मला देखील असं वाटतं,”पाऊस जरी सारखा दिसत असला तरी प्रत्येकाचे त्याच्याकडे बघणे वेगळं असतं,चित्रकाराला तो रंगीबेरंगी दिसतो तर कवीला तो बोलका मित्र वाटतो.नावाड्याला तो वेगळा मार्ग दाखवतो तर गावगाड्याला वेगळी दिशा. वळवाचा पाऊस! मला तो जसा भावला तसा मी तो लिहिला...वेगळं भिजणं अन् भिजून चिंब होणं कोणाला नाही आवडत?? शिल्प-कल्पनेतून काव्य,कविता जन्मते, ओवींमधून,ओळींमधून ती दुडूदुडू रांगते, चालते,धावते,अडखळते नी पडते, राहूनी पुन्हा उभी मिठू मिठू बोलते.. जाणते,नेणते सकल जना-मनाचे भाव, करते विद्रोहातून अन्यायावर वर्मी घाव! काय असते आत ‘पवित्र गर्भात’ तिच्या? लृप्त-सुप्त-दिप्त ‘वाड्ग्मयाचे’ नाव. संस्कारते ती अक्षर आणिक गोंजारते शब्द ओठी, आमरसाचे सत्व,तिच्या रसाळ हापूस गाठी. काय तो गोडवा जसं कैरी-पन्ह्यांचं काव्य, सुखावतात ओठ-कंठ पिऊन पाचक द्रव्य. अवेळी कैद घरट्यात,मानवी प्रजातीचा पक्षी, जगतोय कसाबसा वा रडतोय ओक्साबोक्सी. भटकतोय रात्रंदिन बहाद्दर,’आभासी’ या जगती  ...

राघोबा गणपतराव.

Image
      पारावरच्या   गप्पा   आता   रंगात   आल्या   होत्या ... आधीच   डोक्यावर   ऊन   आलं   होतं   पण   प्रचंड   विस्तारलेल्या   वडाच्या  फांद्यांमुळे   ऊन्हाचा   एक   कवडसा   देखील   आरपार   खाली   येत   नव्हता . अधून   मधून   येणाऱ्या   हवेच्या   झोक्यामुळे   जूनी जाणती   पानं   अलगद   गळून   पडत   होती . सत्तरीतल्या    सहा   मित्रांसाठी   हा   पार   म्हणजे   वर्ल्ड   इकाॅनाॅमिक   फोरमचा जागतिक   विचार   मंच   म्हणावा   असाच   होता . कारण   दररोज   पहाटेच्या   वेळी   शेतावर   जावून   दिवसभराच्या   कामाचा सगळा   आढावा   घेवून   दुपारी   ही   जत्रा   चावडीवर   बसून   सगळे   पेपर   वाचून   अक्षरश :  खांडोळा   करत   असत , निधनवार्ता - बाजारभाव ...