टिकटिक
प्रत्येक घड्याळाचे काटे,
अनाहूत फिरत आहेत,
भारदस्त टवटवित फांदीवरुन,
वाळलेली पाने गळत आहेत.
जीर्णच् म्हणायची ‘ती’ पर्णं,
कधीमधी डुलणारी,आवाज करणारी,
वाऱ्याच्या झुळुकावर आरुढ होणारी,
न जमल्यास मान मोडून गळून पडणारी,
मोडणारी-स्वत:ला झोडणारी,
पुन्हा पडली खाली....
मी उचलणार एवढ्यात,
कोणीतरी पाऊलं त्याच्या उरावर टाकून,
चोरपावलांनी निघून जावं..,
अन् नजरेसमोरच्या प्रसंगात मी गप्प बसावं?
शून्यात जावं?
व्हावं थोडंसं धीरगंभीर पण तरीही आतून लख्ख शांत!
पुन्हा माझ्याकडं बघून त्या वाळक्या-तुटक्यानं हसावं!
जिवंतपणी झाडाला अन्न देणारी अन् गेल्यावर,
मातीला जीव लावणारी,
मातीत मिसळून तिचा पोत उंचावणारी,
स्वत: खोल बुडून,मातीत मातीमोल होवून,
अगदी त्यागून सौंदर्य अन् अस्तित्व!
मी नाहिये स्तब्ध पण...?
मला नाही उमजलं,असं नाही.
पण शेवटामध्ये सुध्दा पुढची सकारात्मकता...
पुन्हा नवा पाऊस,पुन्हा चिखलझाड,
नवा रृतू अन् नव्याचा नवा कोरा निसर्गोत्साह,
नवा बहर,नवा मोहोर,नवेच सगळं काटेकोर.
पुन्हा नविन-नविन सगळं,
अन् जून्याच घड्याळातले जूने काटे,
पण पडणारा काटा पुन्हा नव्याने,
एक एक सेकंद-मिनिट पुन्हा पुन्हा,
पुन्हा नविन वर्ष अन् नवी उमेद.
पुन्हा पुन्हा...तीचं ती गळणारी पाने...
अन् टिकटिकणारं जूनंच घड्याळ...
तसंच चालूय,युगान्-युगं...पिढ्यांन-पिढ्या.
॥चरैवती चरैवती॥
©सुजित

Nice Bro.....
ReplyDeleteThanks bhava
Delete