तिची रात्र
थंडीची वाट वाकडी,
अलगद चालली होती.
उरात तिच्या नाजूक
धग भूकेची पेटली होती.
रपरप पावलांखाली,
एक वहाण तुटली होती,
किर्रर् रातकिड्याच्या राती,
सावली काळोखाची पडली होती,
पाठमोऱ्या कायेवरती,
नजरेची भीती होती.
दानवी-मानवी मनाची आता,
नीती,कुठे हरवली होती?
सावरुन घ्यावं किती?
जेव्हा नजराचं तिरक्या होत्या,
फुटतच् नव्हता शब्द,
केवळ वाफा निसटत होत्या.
रात्रीच्या दयवरांत जेव्हा
अंगावरती हात पडला,
कोसळावी उल्का जशी
नजरेत अंगार चेतवला.
अभिमानी देहातून उमटले
दीर्घ तलवारीचे पाते,
सपसप वार करीत
जपले स्वपावित्र्याचे नाते.
मुलुखांतली बोचरी थंडी,
वाकडी वाट सरत होती,
इज्जतीच्या पदराखाली
भीतीला जाळत होती.
भीतीला जाळत होती.
!! निर्भया !!
©️सुजित

Comments
Post a Comment