Posts

बाप

Image
काहीतरी   असतंच   बापाबददल, बोलायचं   राहून   गेलेलं ... आयुष्याच्या   किनाऱ्यावर , आठवण   म्हणून   वाहून   आलेलं ... बोटाला   धरुन   चालायला   शिकवणारा .. चुकल्यावर   गालावर   बोटं   उमटवणारा ... खांद्यावर   हात  टाकून  जत्रा   फिरवणारा , अन्   रेवड्यांसोबत   गोड   गारेगार   घेणारा ... समुद्रातल्या   लाटेत   नावा   वर   खाली   होताना , मनात   भीतीची   चलबिचल   चालू   असते ... तेव्हा   बकोटीला   धरुन   शांत   करणारा ... आयुष्यात   नेहमी   धीरोदात्त   असणारा ... हेंदकळणाऱ्या   जीवाला   घट्ट   उभं   करणारा ... बापच्   असतो   तो ...! पडत्या   पावसात   चालणारा ... स्वत :  भिजून   मुलांवर   छत्री   धरणारा , ‘ काही   नाही   झालं ’  असं   स्वत :  आजारी   असल्यावर   म्हणणारा , मुलं   आजारी   झाल्यावर ...

नखपुराण

Image
  उजव्या   पायाच्या   नखाचं   नुकतंच   देहावसन   झालं … निमित्तमात्र   जखम   झाली   अन्   आकस्मित   जैविक   युध्दात   गनिमांपुढे   नखाचा   नेटाचा   लढा   कमी प डला. ते   बिच्चारं   नख   माझी   साथ   सोडून   गेलं   पण   या   युध्दप्रसंगी   वेदना   सहन   करुन , शिकवून , धीर   देवून   गेले . बोडकं   पडलेल्या   माण - खटाव   मधल्या   माळावानी   माझा   अंगठा   आता   बोडका   पडलाय … आजूबाजूची   मरणासन्न   त्वचा   नाजूक   वळणावरती   हळूहळू   साथ   सोडत   आहे … कोणी   साथ   सोडत अ सताना   फार   काळ   धरुन   ठेवता   येत   नाही … हळूवार   हाताने   टाटा   करावा   लागतो … कालातीत नखाच्या   मृत्यूनंतर   नखाचा   पुनर्जन्म   होतो   असं   वैद्य   म्हणतात . या   नखाचं ...

२ वर्षांच्या सांध्यावरती...

Image
      गावाकडच्या , शहरांतल्या   जून्या   घरांत   साल   सरलं   की   खुंटीवर   जून्या   दिनदर्शिकेपुढे   नविन   दिनदर्शिका  टांगली   जायची .  अगदी   पूर्ण   खुंटी   भरेपर्यंत . पुढं   माणसं   जरा   कलंदर  झाली , घरातल्या   खुंट्या   जावून   हॅंगर   आले   तशी   दिनदर्शिकेची   जागा   कॅलेंडरने घे तली. हॅंगरवर   अपुरी   जागा   असल्याने   जुनी   दिनदर्शिका   काढून   तिथं   नविन   कॅलेंडर   लागायला   लागलं. २०   व्या   ते   २१   व्या   शतकात   असं   लघू   संक्रमण   व्हायचंच  होतं.  ते   होत   गेलं.  छोट्या   पिनच्या चा र्जरपासून ते  इलेक्ट्रिक   गाड्यांपर्यंत . असो … वर्ष   संपलं!  खूप   काही   देवून - घेवूनच   संपलं. कभी   खूशी   कभी   गम.  जूनी   पानं ...