नखपुराण
उजव्या पायाच्या नखाचं नुकतंच देहावसन झालं … निमित्तमात्र जखम झाली अन् आकस्मित जैविक युध्दात गनिमांपुढे नखाचा नेटाचा लढा कमी प डला. ते बिच्चारं नख माझी साथ सोडून गेलं पण या युध्दप्रसंगी वेदना सहन करुन , शिकवून , धीर देवून गेले . बोडकं पडलेल्या माण - खटाव मधल्या माळावानी माझा अंगठा आता बोडका पडलाय … आजूबाजूची मरणासन्न त्वचा नाजूक वळणावरती हळूहळू साथ सोडत आहे … कोणी साथ सोडत अ सताना फार काळ धरुन ठेवता येत नाही … हळूवार हाताने टाटा करावा लागतो … कालातीत नखाच्या मृत्यूनंतर नखाचा पुनर्जन्म होतो असं वैद्य म्हणतात . या नखाचं ...