Posts

Showing posts from June, 2023

विठ्ठल

Image
  विठ्ठल बोलावा   विठ्ठल   पाहावा   विठ्ठल , जाणावा   विठ्ठल   मनोभावे   ॥   ‘ विठ्ठल ’  भोळ्याभाबड्या   माणसांचा   देव . लहानथोरांपासून ते गरीब-श्रीमंत भेदाभेदापलीकडचा आपलासा वाटणारा आपला देव. तो   सगुण   रुपात   कर   कटेवर   ठेवलेला   सगळीकडे   दिसून   येतो   पण   निर्गुण   स्वरुपात   तो   सर्वत्र   ठाईठाई   आढळतो . तो   गोरा   कुंभाराच्या   पायाखाली   बडणाऱ्या   मातीत   असतो , सावता   माळ्याच्या   उभ्या   पिकामध्ये   डुलत   असतो , नरहरीच्या   हातोड्यात   असतो , तुकोबाच्या अ भंगात   दंग   होत   असतो,ज्ञानोबाच्या विचारी बुध्दीत असतो … तो   सगळीकडे   असतो ,पण  प्रथमत :  तो   भाविकांच्या   मनात   असतो … आषाढीच्या  वारकऱ्यांच्या   रुपात   तो   मैलोनमैल   चालत अ सतो , मृदुगं - टाळ   घोषात   निनादत   असतो … तुळ...