विठ्ठल
विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल , जाणावा विठ्ठल मनोभावे ॥ ‘ विठ्ठल ’ भोळ्याभाबड्या माणसांचा देव . लहानथोरांपासून ते गरीब-श्रीमंत भेदाभेदापलीकडचा आपलासा वाटणारा आपला देव. तो सगुण रुपात कर कटेवर ठेवलेला सगळीकडे दिसून येतो पण निर्गुण स्वरुपात तो सर्वत्र ठाईठाई आढळतो . तो गोरा कुंभाराच्या पायाखाली बडणाऱ्या मातीत असतो , सावता माळ्याच्या उभ्या पिकामध्ये डुलत असतो , नरहरीच्या हातोड्यात असतो , तुकोबाच्या अ भंगात दंग होत असतो,ज्ञानोबाच्या विचारी बुध्दीत असतो … तो सगळीकडे असतो ,पण प्रथमत : तो भाविकांच्या मनात असतो … आषाढीच्या वारकऱ्यांच्या रुपात तो मैलोनमैल चालत अ सतो , मृदुगं - टाळ घोषात निनादत असतो … तुळ...