हरवलेले शब्द
बोलण्यासाठी हवेत शब्द , टाळण्यासाठी रुक्ष शांतता , हरवते कोसोदूर चित्ती , मनातल्या भावनांची गर्तता …! दाटते रेशमी दाट धुके , ओठांत रुते शब्द मुके , अबोल हृदयात वाजे , टिकटिकीचे असंख्य ठोके …! आस लागे मनांत , मन हरवते आसमंत , न लागे कशास थांग , लांब लांब अंतर अनंत …! कल्लोळ म्हणावा की अन्य , बेरीज - वजाबाकी शून्य , कशात होई धन्य , कोडं हे सुटेना ..! बोलावे कि राहावे अबोल , शिरावे का इतके सखोल ? कि चालत राहावे भूगोल ? भेटे पृथ्वी बोलता बोलता गोल ..! देह मनाचे आगार , मन विचारांचे भांडार , मेळ घालूनी सत्वर , फिरवावा मैत्रीचा नांगर ..! याची मनांतले श्लोक पुरे , कितीही बोलत...