महाराष्ट्राची एकसष्टी
सह्याद्रीची मनमोहक निसर्गसृष्टी , अंबोलीची धोधो पर्जन्यवृष्टी , लोणारची उल्कापत्ती , वेरुळची त्रिमिती , मुंबईची सिएसएमटी ! महाराष्ट्राची एकसष्टी ! मला महाराष्ट्राचा नकाशा उभा - आडवा पाहिला की भारताचा नकाशाच वाटतो . अगदी तंतातंत बिलकुल नाही पण कन्याकुमारीचा द्विपकल्प जसा निमुळता आहे तसा तळकोकणात महाराष्ट्र आहे . मग आंध्रात एका वळणानंतर बंगालपर्यंत सरळ भूभाग / किनारपट्टी आहे , तसा भूभाग कोल्हापूर - सांगलीपासून यवतमाळपर्यंत आहे . थोडं पलीकडे ईशान्यतल्या मिझोरमची तटबंदी आहे तसा गडचिरोलीचा देखील अभेद्य बुरुज आहे , पश्चिमेकडे भारताची अन् राज्याची सीमा अरबी समुद्रास एकत्रित भेटते . वायव्य...