साठी
साठी . योगायोग म्हणजे त्याचा जन्म ६० चाच . देशाला स्वातंत्र्य मिळून १३ - १४ वर्ष झाली असतील तेव्हा हा जन्मला , देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यापासून पुढं होऊन लढणारा . जन्मापासूनच एकदम रांगडा पण कृष्णा - गोदासारखा सुंदर देखणा . शूरवृत्तीचा पण अभ्यासाने - विचाराने पुरोगामी . कष्टाळू अन् अर्थकारणात समाजकारणात सर्वांना सामावून घेणारा . लोकांच्या हाताला काम अन् कर्तृत्वाला ईनाम देणारा , नाव बनवणारा . लोककलेला दाद देणारा अन् आधुनिक कलेला नवा संवाद देणारा . नेतृत्त्वगुणसंपन्न पण तरीही कुटुंबाचा प्रमुख न होण्याचं शल्य मनात न धरतां शेती , उद्योग , सेवा या सगळ्याच क्षे...