टिकटिक
प्रत्येक घड्याळाचे काटे , अनाहूत फिरत आहेत , भारदस्त टवटवित फांदीवरुन , वाळलेली पाने गळत आहेत . जीर्णच् म्हणायची ‘ ती ’ पर्णं , कधीमधी डुलणारी , आवाज करणारी , वाऱ्याच्या झुळुकावर आरुढ होणारी , न जमल्यास मान मोडून गळून पडणारी , मोडणारी - स्वत : ला झोडणारी , पुन्हा पडली खाली .... मी उचलणार एवढ्यात , कोणीतरी पाऊलं त्याच्या उरावर टाकून , चोरपावलांनी निघून जावं .., अन् नजरेसमोरच्या प्रसंगात मी गप्प बसावं ? शून्यात जावं ? व्हावं थोडंसं धीरगंभीर पण तरीही आतून लख्ख शांत ! पुन्हा माझ्याकडं बघून त्या वाळक्या - तुटक्यानं हसावं ! जिवंतपणी झाडाला अन्न देणारी अन् गेल्यावर , माती...