श्रावणसरी
मैथिलीने घड्याळात पाहिले ... ६ वाजत आले होते .. सूर्यास्त दिसण्याची शक्यता नव्हतीच .. ढग दाटून आले होते ... पण तरी मैथिलीला घाटावरच्या कड्यावर जायची तीव्र इच्छा होतीच ... तिने पार्किंगमधून आपली स्विफ्ट बाहेर काढली ... आणि रेडिओ सिटी नाईन्टीफाईव्ह पाॅंईंट फाईव्ह एफ एम वर आरजे संयमीचा मधूर आवाज ऐकू लागली ... मैथिली .. प्रचंड बुध्दिमत्तेची चुणचुणित मुलगी ... गावात राहून गणितात मास्टर्स केलेली आणि आता एका मोठ्या बिझनेस कंपनीमध्ये डेटा ॲनेलिसिस्ट असणारी ... सगळं काही तल्लख बुध्दीने करणारी आणि कुटुंबीय आयुष्यात सर्वांना सामावून घेणारी ... सकाळी दूध ...