Posts

Showing posts from March, 2019

थिम्मक्का

Image
या नावाचा शब्दश : अर्थ मला माहित नाही ... परवा परवा राष्ट्रपती भवनात ‘ पद्म ’ पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला , त्या वेळी थिम्मक्का हे नाव ऐकलं ... सालुमरादा थिम्मक्का ! केवळ १०७ वर्षांची ही तरुणी , माझ्या आज्जी किंवा पणजीच्या वयाची आणि म्हणूनच ‘ एकेरी ’ उल्लेख ... आपलेपणा आणि प्रेम , दोन्हीही . लग्नानंतर थिम्मक्काला मूल होत नव्हते , भारतीय समाजात मूलबाळ न होणाऱ्या स्त्रीयांबद्दल ‘ इतर स्त्रीयाच् ’ काय काय बोलतात हे आपण भारतीय जाणतोच ,पुरुषांबद्दल न बोललेलं बर.. थिम्मक्का पण हेच बोलणं ऐकायची , हळहळायची , धाय मोकलून रडायची ... तिने ‘ आत्महत्येचे ’ कैक प्रयत्न पण केले , पण खंबीर नवरा सोबत होता , तो तिला आधार द्यायचा , तिची आसवं पुसायचा , कठीण काळात साथ देतं ते खरं प्रेम ! त्यांनी नंतर एक मुलगा पण दत्तक घेतला ... आता खरी गोष्ट सुरु होते थिम्मक्का आणि तिच्या मातृत्वाची ...कर्नाटकमधल्या ‘हुलीकाल वरुन आपली गाडी तर भरधाव वेगाने सुटते पण तेथेच थांबते ते आपले मन आणि शहारुन जाते ते ओजस्...