तिची रात्र
थंडीची वाट वाकडी , अलगद चालली होती . उरात तिच्या नाजूक धग भूकेची पेटली होती . रपरप पावलांखाली , एक वहाण तुटली होती , किर्रर् रातकिड्याच्या राती , सावली काळोखाची पडली होती , पाठमोऱ्या कायेवरती , नजरेची भीती होती . दानवी - मानवी मनाची आता , नीती , कुठे हरवली होती ? सावरुन घ्यावं किती ? जेव्हा नजराचं तिरक्या होत्या , फुटतच् नव्हता शब्द , केवळ वाफा निसटत होत्या . रात्रीच्या दयवरांत जेव्हा अंगावरती हात पडला , कोसळावी उल्का जशी नजरेत अंगार चेतवला . अभिमानी देहातून उमटले दीर्घ तलवारीचे पाते , सपसप वार करीत जपले स्वपावित्र्याचे नाते . मुलुखांतली बोचरी थंडी , वाकडी वाट सरत होती , इज्जतीच्या पदराखाली भीतीला जाळत होती . भीतीला जाळत होती . !! निर्भया !! ©️ सुजित