बाईंडिंग
सहज कपाटात पुस्तके बघत होतो , खाली असलेल्या जून्या वहीकडे लक्ष गेलं , माझ्या शालेय जीवनातली असावी म्हणून मी नकळत चाळू लागलो . लहानपणापासून आपला आनंद आपल्याही नकळत कशात सामावला असेल तर तो म्हणजे नव्या - जून्या पुस्तक - वह्या उघडल्यावर डोळे बंद करून त्याचा वास घेण्यामध्ये ! अर्थात वयं वाढतं म्हणून त्यातला आनंद कमी होत नाही , उलट अश्या बाल आठवणींनी तो दुणावतो . कडक पुठ्ठ्यावर नक्षी असलेली ती “ बाईंडिंग ” केलेली वही माझ्या ‘ शाळा ’ या ऐतिहासिक काळातली होती . शाळा ही गोष्टच् मूळात ऐतिहासिक असते , नंतर कधीतरी तिच्याबद्दल लिहिन . तर पुन्हा “ तिच्याकडे ” वळतो , किंबहूना तिला उलगडण्याचा प्रयत्न करतो ... पहिल्या पानावर आमचंच नाव दिमाखदार शैलीमध्ये लिहिलं होतं , अक्षर लय देखणं नसले तरी स्वत : ला आवडेल एवढं बरं होतं . कोणत्यातरी महान व्यक्तींचा “ विचार ” तिकडंच गिरवलेला होता , बर वाटलं वाचून . एकएक पान उलगडत पुढे सरकत...