Posts

Showing posts from August, 2017

कबड्डी...कबड्डी...कबड्डी...

Image
       सूर्याची किरणं क्षितिजाला समांतर झाली ...दिवस अस्ताला जायच्या लगबघित होता...सकाळी गावाबाहेर पडलेली जनावरं धन्यासोबत गावात परतत होती...दिवसभर शांत असलेलं गाव पुन्हा एकदा गावगर्दीने न्हावून निघत होतं... कोणी आडावर पाण्यासाठी कावडी घेऊन जात होतं तर कोणी अंगणात पाण्याचा सडा मारून मातीचा धुराळा शांत करत होतं...एक सुहासिक मृदगंध आसमंतात दरवळत होता...मनाला उल्लासित करत होता..       चहाचा घोट पिऊन झाल्यावर तोंडात चिरमुऱ्याचा भुकना भरून "आई,मी देवळासमोर खेळायला जातो" म्हणून गज्याने देवळाकडे फटफटीच्या आवाजात धूम ठोकली...तोवर बाकीच्या पट्टयानी हातात काठी घेऊन मैदानाची सीमा आखली होती...२ कर्णधारांनी आपापल्या खस्कीतले आपले मित्र ताडून संघात घेतले...चड्डीतले १२ वर्षाचे कबड्डीपटू भुईचा भंडारा लल्लाटी लावून खेळायला सज्ज झाले...       विक्याने ओपनिंग केली...कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी ...बड्डी ..बड्डी ..कब्बडी...बडी.. बडी... गर्जना करून वातावरणात जान आणली...विक्या इरेला पेटून खेळायला लागला...समोरच्या संघात विक्याला घेरायची रणनिती शिजत होती...ते...