फिर मिलेंगे चलते चलते...
रिमझिमणाऱ्या सरी अंगावर झेलत पाऊले झपाझप पडत होती,केसांच्या पात्यावर दवबिंदू अलगद साचत होते...अन् हेडफोनमधून वाजणारं अरिजित सिंगच्या 'ए दिल है मुश्किलच्या' धुंदीत मी आपल्याच तंद्रीत 'Z Bridge' च्या बाजूच्या पात्रातून 'हिरवळ' बघत चाललो होतो...अचानक समोर आलेल्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच माझ्या भुवयांच्या कडा नकळत उचलल्या गेल्या,एव्हाना त्या प्रसन्न चेहऱ्याने एक गोड smile दिलेली होती....आकस्मित मिळालेल्या जादूच्या झप्पीमुळे पावलांचा वेग मंदावून हृदयात टिक टिक वाजत होती,वाढत होती ! Hii (मी थोड्याश्या हळू आवाजात पुट्पुटलो...) समोरून काहीच reply आला नाही..(सरसर अंगावर रोमांच उभा राहिला..!) थोडं daring करून मीच जवळ गेलो आणि पुन्हा shake hand साठी हात पुढे केला, फ्रॅक्चर झालेला हात सावरत समोरून हात पुढे आला...ओळख परेड झाली अन हळुहळू गप्पांचा फड रंगत गेला... नुकत्याच झालेल्या event मुळे 'गणपतराव' थकलेले होते,विसर्जनाच्या वेळी दुसऱ्या मंडळाकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे एक दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते,काहीश्या नाराज mood मधेच कण्हत कण्हत हालचाल ...