२ वर्षांच्या सांध्यावरती...
गावाकडच्या , शहरांतल्या जून्या घरांत साल सरलं की खुंटीवर जून्या दिनदर्शिकेपुढे नविन दिनदर्शिका टांगली जायची . अगदी पूर्ण खुंटी भरेपर्यंत . पुढं माणसं जरा कलंदर झाली , घरातल्या खुंट्या जावून हॅंगर आले तशी दिनदर्शिकेची जागा कॅलेंडरने घे तली. हॅंगरवर अपुरी जागा असल्याने जुनी दिनदर्शिका काढून तिथं नविन कॅलेंडर लागायला लागलं. २० व्या ते २१ व्या शतकात असं लघू संक्रमण व्हायचंच होतं. ते होत गेलं. छोट्या पिनच्या चा र्जरपासून ते इलेक्ट्रिक गाड्यांपर्यंत . असो … वर्ष संपलं! खूप काही देवून - घेवूनच संपलं. कभी खूशी कभी गम. जूनी पानं ...